Wednesday, February 17, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी औरंगाबाद : लग्नासाठी निघालेल्या वाहनावर काळाचा घाला; ३ जणांचा मृत्यू, ७ जण...

औरंगाबाद : लग्नासाठी निघालेल्या वाहनावर काळाचा घाला; ३ जणांचा मृत्यू, ७ जण जखमी

लग्नाच्या गाडीचा अपघात झाला असून या अपघातात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर सात जण जखमी झाले आहेत.

Related Story

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून अपघाताच्या मालिका सुरुच आहेत. मंगळवारी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघात होऊन त्या अपघातात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले. ही घटना ताजी असताना पुन्हा एकदा अपघाताची घटना समोर आली आहे. औरंगाबादमध्ये लग्नासाठी निघालेल्या वाहनाचा अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर जवळील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

कुठे झाला अपघात?

मिळालेल्या माहितीनुसार; औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड शहरातील चौधरी पेट्रोल पंपाजवळ ट्रक आणि क्रूझर वाहनात धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तात्काळ रुग्णालयाला आणि पोलिसांना पाचारण केले. या अपघातात मृत्यू झालेल्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून ते शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. लग्न समारंभासाठी निघालेल्या गाडीवर काळाचा घाला बसल्याने कुटुंबियांमध्ये दुखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच मृतांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. या अपघाताचा पोलीस शोध घेत असून याप्रकरणी प्रत्यक्षदर्शींकडून चौकशी केली जात आहे.


- Advertisement -

हेही वाचा – दहावी, बारावीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर, ‘हे’ आहेत बदल


 

- Advertisement -