भाजपच्या तीन माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

भाजपच्या तीन नगरसेवकांसह विविध पक्षांच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी केला शिवसेनेत प्रवेश

eknath shinde to arrive in mumbai on special flight to meet governor shocks thackeray govt

मुंबई : कल्याण-डोंबिवली मधील भाजपच्या तीन माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यात भाजपचे डोंबिवलीमधील नगरसेवक महेश पाटील, सायली विचारे आणि सुनीता पाटील यांचा समावेश असून त्यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते हातावर शिवबंधन बंधुन घेत शिवसेनेत पक्षप्रवेश केला.

शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक जण शिवसेनेत प्रवेश करत आहेत. आज भाजपच्या तीन नगरसेवकांसह विविध पक्षांच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आज राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण-डोंबिवलीचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षांतराचा सोहळा मुंबईत पार पडला. यावेळी बोलताना स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आगामी कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत पक्षाला घवघवीत यश मिळवून देण्यासाठी पक्षप्रवेश करणारे सर्व कार्यकर्ते आपले सर्वस्व पणाला लावून काम करतील अशी अपेक्षा श्री. शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

या तीन नगरसेवकांशिवाय आज पक्षप्रवेश करणाऱ्या पदाधिकार्यामध्ये माजी परिवहन समिती सदस्य संजय राणे, मनसे पदाधिकारी सुभाष पाटील, रवी म्हात्रे, विजय बाकोडे, सुजित नलावडे, पंढरीनाथ म्हात्रे, भालचंद्र म्हात्रे, प्रवीण म्हात्रे, राजाराम म्हात्रे, देवा माने, मोहन पुंडलिक म्हात्रे, हनुमंत ठोंबरे, विक्की हिंगे, उज्ज्वला काळोखे आणि इतर कार्यकर्ते यांचा समावेश होता.

यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, कल्याण डोंबिवली मनपाच्या माजी महापौर सौ.विनिता राणे, शहरप्रमुख राजेश मोरे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उप जिल्हाप्रमुख राजेश कदम, उप जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे, नगरसेवक दिपेश म्हात्रे तसेच शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.