घरठाणेझाडाने रोखून धरली मुंब्र्याची वाट; तीन तास वाहतुक ठप्प

झाडाने रोखून धरली मुंब्र्याची वाट; तीन तास वाहतुक ठप्प

Subscribe

कळवा, खारेगाव नाका, येथे राजदीप हॉटेल समोर रस्त्यावरती झाड पडल्याची घटना सोमवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडली. यामुळे ठाण्याकडून मुंब्र्याकडे जाणारी वाहतुक तीन तास खोळंबली होती.

कळवा, खारेगाव नाका, येथे राजदीप हॉटेल समोर रस्त्यावरती झाड पडल्याची घटना सोमवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडली. यामुळे ठाण्याकडून मुंब्र्याकडे जाणारी वाहतुक तीन तास खोळंबली होती. या घटनेत रस्त्याच्या बाजूला उभ्या केलेल्या एका चारचाकी गाडीचे ही नुकसान झाले आहे. झाड कापून बाजूला केल्यावर रस्ता वाहतुकीसाठी सुरू झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली. (Three hour traffic jam in Mumbai due to tree collapse)

कळवा, खारेगाव येथे रस्त्यावर सोमवारी पहाटे चारच्या सुमारास झाड पडले अशी माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षेला मिळताच,घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन, वृक्ष प्राधिकरणल, टोरंट विद्युत, कळवा वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दल हे विभाग दाखल झाले.

- Advertisement -

या घटनेत रस्त्याच्या उभ्या केलेल्या एका चारचाकी वाहनावर ते झाड पडल्याने त्या गाडीचे नुकसान झाले. त्यातच, ते झाड ठाण्याकडून मुंब्र्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरती पडल्यामुळे त्या रस्त्यावरील वाहतूक सुमारे तीन तास ठप्प झाली होती. तसेच रस्त्यावरती पडलेले झाड आपत्ती व्यवस्थापन, वृक्ष प्राधिकरण आणि अग्निशमन या तिन्ही विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कापून बाजूला केले. त्यानंतर तो रस्त्या वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला आहे. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.

राज्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. जोरदार वारा आणि पावसामुळे सखल भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून गडचिरोली जिल्ह्याला अतीवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता असल्याने जिल्ह्यातील शाळा, कॉलेज आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – गडचिरोली जिल्ह्यात ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -