Homeताज्या घडामोडीYavatmal News : विदर्भातील 3 लाख अतिवृष्टीग्रस्त शेतकरी नुकसानभरपाईच्या प्रतिक्षेत

Yavatmal News : विदर्भातील 3 लाख अतिवृष्टीग्रस्त शेतकरी नुकसानभरपाईच्या प्रतिक्षेत

Subscribe

गतवर्षी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी सरकारने अनेक मदतीची घोषणा ही केली. पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत ही मदत अद्याप पोहोचली नसल्याची माहिती समोर येत आहे.

यवतमाळ : गतवर्षी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी सरकारने अनेक मदतीची घोषणा ही केली. पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत ही मदत अद्याप पोहोचली नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे ही मदत कधी मिळणार आणि आर्थिक संकट कधी दूर होणार, याची प्रतिक्षा शेतकऱ्यांना लागली आहे. (Three lakh farmers affected by heavy rains in Vidarbha are waiting for compensation from maharashtra government)

मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात विदर्भात मुसळधार पाऊस झाला. यवतमाळ, वाशीम, अकोला, बुलढाणा अमरावती या पाचही जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे 3 लाख 23 जहर 89 शेतकऱ्यांची 2 लाख 80 हजार 641 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यानी तातडीच्या मदतीची घोषणा केली. त्यानुसार, नुकसानी भरपाईपोटी 386 कोटी 23 लाख 48 हजार रुपयांचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र हा प्रस्ताव अद्याप मान्य झालेला नाही.

शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट दूर करण्याचा सरकारचा प्रयत्न होता. मात्र, असं असलं तरी, अजुनही अतिवृष्टीग्रस्त शेतकरी आर्थिक मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली आर्थिक मदत त्यांना लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. याशिवाय, विरोधकांनी ही अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार, असा सवाल उपस्थित करत सरकारवर ताशेरे ओढण्यास सुरूवात केली आहे.

विधानसभेची निवडणूक आटोपून मंत्रिमंडळाची स्थापना झाली. मात्र महायुती सरकारने शेतकऱ्यांना मदतीचा दिलेला शब्द अजूनपर्यंत पाळला नाही. लाडक्या बहिणीला मदती मानधन कधी मिळेल याची माहिती सरकार देत आहे. पण शेतकरी आपल्या शेतात झालेल्या नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानीची मदत कधी मिळेल याकडे आस लावून बसला आहे. ही मदत नेमकी कधी मिळणार हे सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी काँग्रेस आमदार विजय वेडेट्टीवार यांनी केली आहे.


हेही वाचा – Baba Siddique Case : झिशान सिद्दीकींनी पोलीस जबाबात नाव घेताच भाजप नेते आले समोर; म्हणाले, 15 वर्षांपासून…