घरमहाराष्ट्रपाय पसरुन बसला म्हणून तरुणाची हत्या!

पाय पसरुन बसला म्हणून तरुणाची हत्या!

Subscribe

रस्त्यावर पाय पसरुन बसला म्हणून नाशिकमध्ये तरुणाची हत्या करण्यात आली आहे. तीन तरुणांनी एका तरुणाला लोखंडी रॉड आणि क्रिकेटच्या बॅटने अमानूषपणे मारहाण केली. या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला.

काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये पेट्रोल आणायला उशीर का झाला? या शुल्लक कारणावरुन मित्राचा खून झाल्याची घटना घडली होती. नाशिकमध्ये आता पुन्हा याच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. रस्त्यावर एक तरुण पाय पसरुन बसला होता. फक्त याच कारणावरुन तीन जणांनी या तरुणाची हत्या केली आहे. हत्या करणाऱ्या तीन तरुणांनी एका तरुणाला लोखंडी रॉड आणि क्रिकेटच्या बॅटने मारहाण केली, या मारहाणीमुळे तरुणाचा मृत्यू झाला. दरम्यान, हत्या करणाऱ्या तरुणांच्या विरोधात नाशिक रोड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

नाशिकच्या सिन्नर फाटा येथील विष्णू नगर परिसरात ही घटना घडली आहे. या परिसरात राहणारा अझीम शेख हा तरुण शनिवारी रात्री २ वाजेच्या सुमारास त्याच्या घरासमोर पाय पसरुन बसला होता. दरम्यान, त्या ठिकाणी संशयित आरोपी सचिन महाजन (३६), नाना महाजन (४०) राहुल महाजन (२०) हे तीघेजण आले. रस्त्यावर पाय पसरुन का बसला, असा प्रश्न विचारत या तिघांनी अझीमला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी या तिघांनी लोखंडी रॉड आणि क्रिकेट बॅटने अझीमला मारहाण केली. त्यानंतर हे तिघेजण फरार झाले. परिसरातील नागरिकांना याविषयी माहिती मिळताच त्यांनी ताबोडतोब आझीमला रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात अझीमला नेल्यावर तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यानंतर या घटनेबाबत नाशिक रोड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस या घटनेमागील संशयित आरोपींचा शोध घेत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध सुरु आहे. यासाठी एक वेगळे पथक देखील रवाना करण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – गाडीला कट मारल्याने उल्हासनगरमध्ये तरुणाची हत्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -