Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE CoronaVirus: पुण्यात तीन नवे रुग्ण तर साताऱ्यात एक नवा रुग्ण!

CoronaVirus: पुण्यात तीन नवे रुग्ण तर साताऱ्यात एक नवा रुग्ण!

Related Story

- Advertisement -

राज्यात करोनाग्रस्तांचा संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यात तीन आणि साताऱ्यात आणखी एक करोनाचा रुग्ण आढळला आहे. राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या ही ९७ वरून १०१वर पोहोचली आहे. त्यामुळे राज्यातील चिंतेत भर आणखी भर पडली आहे. देशातील करोनाग्रस्तांची संख्या ५०४वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात करोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने संपूर्ण राज्य लॉकडाऊन केले आहेत.

- Advertisement -

आतापर्यंत जगभरातील करोनाग्रस्तांची ३ लाख ७९ हजार ३७५ वर पोहोचली आहे. तसंच या करोनामुळे १६ हजार ५०९ जण बळी पडले आहेत. मात्र एक दिलासा देणारी बाब म्हणजे करोनामुळे १ लाख ४८४ जण रिकव्हर झाले आहेत.

आतापर्यंत राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या

मुंबई आणि उपनगर – ३८
पुणे – १९
पिंपरी-चिंचवड – १२
नवी मुंबई – ५
नागपूर – ४
यवतमाळ – ४
कल्याण – ४
सांगली – ४
अहमदनगर – २
रायगड+ पनवेल – २
ठाणे – २
औरंगाबाद – १
उल्हासनगर – १
रत्नागिरी – १
वसई-विरार – १
सातारा – २


- Advertisement -

हेही वाचा – Corona Virus : कोल्हापुरातून करोनाचा संशयित रुग्ण रुग्णालयातून पसार


 

- Advertisement -