Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रMaharashtra Politics : मुख्यमंत्रीपदी कोण? राष्ट्रवादीच्या तीन नेत्यांच्या वेगवेगळ्या भूमिका

Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदी कोण? राष्ट्रवादीच्या तीन नेत्यांच्या वेगवेगळ्या भूमिका

Subscribe

महायुतीमध्ये घटकपक्ष असलेल्या भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडूनही आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, अशी मागणी होताना दिसत आहे. अशातच माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या छगन भुजबळ, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत वेगवेगळ्या भूमिका मांडल्या आहेत.

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचा सुपडा साफ केला. त्यानंतर आता महायुतीकडून मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा आता राज्याच्या राजकारणात रंगली आहे. महायुतीमध्ये घटकपक्ष असलेल्या भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडूनही आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, अशी मागणी होताना दिसत आहे. अशातच माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या छगन भुजबळ, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत वेगवेगळ्या भूमिका मांडल्या आहेत. (Three NCP leaders have different positions on the post of Maharashtra Chief Minister)

विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळताना पाहून शिवसेनेच्या नेत्यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे भाजपाने देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावे, अशी मागणी केली आहे. याप्रकरणी आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे म्हणाले की, अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पण प्रदेशाध्यक्ष म्हणून मी एक गोष्ट नेहमी म्हटली आहे की, आम्ही वास्तववादी आहोत. आम्हाला आता आमचा पक्ष अधिक मजबूत करायचा आहे. सरकारमधला सहभाग हा बहुजनांच्या व्यापक हितासाठी करणे, हाच मूलमंत्र लक्षात ठेवून अजित पवार काम करत आहोत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या अपेक्षा राहतील, पण या संदर्भातील निर्णय भाजपाचे पक्षश्रेष्ठी घेतील, अशी भूमिका मांडत सुनील तटकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दर्शवली. अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला आमचा विरोध असण्याचे कारण नाही, असे स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Legislative Council seat vacant : निवडणूक जिंकली, आता विधान परिषदेच्या 6 जागांवर कोणाला संधी? 

अद्याप कोणाच्याच नावावर चर्चा नाही – प्रफुल पटेल

दरम्यान, मुख्यमंत्री पदासाठी कोणाच्या नावावर चर्चा सुरू आहे? असा प्रश्न अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांना विचारला आला. ते म्हणाले की, अद्याप कोणाच्याच नावावर आम्ही चर्चा केलेली नाही. आम्ही महायुतीमध्ये आहोत. त्यामुळे तिन्ही पक्षांमध्ये चर्चा आणि समन्वय झाल्यानंतर आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री पदाच्या नावाबद्दल सांगू शकतो. नवीन मुख्यमंत्री होईपर्यंत आमच्या जुन्या सरकारची व्यवस्था तशीच आहे. पण 26 तारखेला महाराष्ट्राच्या विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्यामुळे काही लोकांचं म्हणणं आहे की, 26 तारखेलाच मुख्यमंत्रीपदासाठी शपथ झाली पाहिजे. तर काही लोकांचं म्हणणं आहे की, विधानसभेचं फॉरमॅशन झालं की, शपथ झाली पाहिजे, अशी माहितीही प्रफुल पटेल यांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा – Ladki Bahin Yojna : निवडणुकीत गेम चेंजर लाडकी बहीण; सौनिक दाम्पत्य पडद्यामागील कलाकार 


Edited By Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -