घरताज्या घडामोडीCoronavirus : नागपूरच्या रुग्णालयातून पळून गेलेले संशयित पुन्हा दाखल

Coronavirus : नागपूरच्या रुग्णालयातून पळून गेलेले संशयित पुन्हा दाखल

Subscribe

नागपूर मधील मेयो रुग्णालयातून करोना संशयित पळून गेले होते. मात्र, आता पुन्हा या संशयित रुग्णाना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नागपूर मधील मेयो रुग्णालयातून करोना संशयित पळून गेल्याची घटना आज सकाळी घडली होती. रुग्णालयातून फरार होऊन घरी गेले होते. मात्र, निघून गेलेल्यांपैकी तीन संशयित करोना रुग्ण पुन्हा रुग्णालयात परतले असल्याची माहिती नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, रुग्णालयाबाहेर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढत असताना या चिंतेत भर टाकणारी घटना घडल्यामुळे सर्वांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. मात्र, त्यांना आता पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी रवींद्र एच ठाकरे यांनी दिली आहे.

एक रुग्ण अद्याप परतलेला नाही

नागपुरात एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला होता. या रुग्णाच्या संपर्कात हे चार संशयित रुग्ण आले होते. या संशयित चारही रुग्णांना शासकीय मेयो रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, आज सकाळी अचानक कोणालाही काही कल्पना न देता ते निघून गेले. त्यामुळे नागपूरात एकच खळबळ उडाली. मात्र, आता मेयो रुग्णालयाबाहेर पोलीस तैनात करण्यात आले असून तीन रुग्ण परतल्यानंतर आता आणखी एक रुग्णही परतेल असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

नेमके काय घडले?

आज, शनिवारी पहाटे या वॉर्डात करोनाची लागण झालेला एक रुग्ण असल्याची अफवा पसरली आणि रुग्णांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यानंतर संधी साधून एका मागून एक, असे चार रुग्ण वॉर्डातून पसार झाले, अशी चर्चा होती. यानंतर पोलिसांनी तातडीने या रुग्णांचा शोध सुरु केला. कालच संध्याकाळी या संशयित रुग्णांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्या सर्व संशयितांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यापैकी एकाची कोरोना टेस्ट नेगेटिव्ह आली होती. तर उर्वरित चौघांचे रिपोर्ट आज उपलब्ध होणार होते. मात्र, ते रिपोर्ट येण्याआधीच या संशयित रुग्णांनी रुग्णालयातून पळ काढला.


हेही वाचा – जीममध्ये व्यायाम करताना १८ वर्षीय तरूणाचा धक्कादायक मृत्यू

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -