Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी 'अमित शाहांच्या भीतीने तीन पक्ष एकत्र...', आशिष शेलारांचा मविआच्या वज्रमुठीला टोला

‘अमित शाहांच्या भीतीने तीन पक्ष एकत्र…’, आशिष शेलारांचा मविआच्या वज्रमुठीला टोला

Subscribe

'आमचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भीतीने तीन पक्ष एकत्र आलेत, त्याला हे वज्रमूठ वगैरे म्हणतात', अशा शब्दांत भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला.

‘आमचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भीतीने तीन पक्ष एकत्र आलेत, त्याला हे वज्रमूठ वगैरे म्हणतात’, अशा शब्दांत भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. शिवाय, ‘मुंबई महापालिकेत केलेल्या भ्रष्टाचाराची जंत्री भविष्यात उघड होणार म्हणून अगोदरच झोळी पसरुन सहानुभूती गोळा करण्याचा जोरदार कार्यक्रम म्हणजे यांची वज्रमूठ’, अशी टीकाही शेलारांनी केली. (Three parties united in fear of Amit Shah Says Ashish Shelar criticizes Mva Vajramuth)

भाजपा नेते आशिष शेलार यांनी ट्विटरच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या मुंबईतील वज्रमुठ सभेवर हल्लाबोल केला आहे. “आमचे केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांच्या भीतीने तीन पक्ष एकत्र आलेत, त्याला हे वज्रमूठ वगैरे म्हणतात. पण ही दुर्बळांची भयभीत सभा आहे. तिघे एकत्र आले तरी भय संपले नाही अजूनही गोळाबेरीज सुरू आहेच. दुसरं कारण मुंबई महापालिकेत केलेल्या भ्रष्टाचाराची जंत्री भविष्यात उघड होणार म्हणून अगोदरच झोळी पसरुन सहानुभूती गोळा करण्याचा जोरदार कार्यक्रम म्हणजे यांची वज्रमूठ”, अशा शब्दांत आशिष शेलार यांनी मविआवर निशाणा साधला.

- Advertisement -

छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील वज्रमूठ सभेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आता महाविकास आघाडीची मुंबईत आज तिसरी वज्रमूठ सभा पार पडली. या सभेतील जनतेला संबोधित करताना महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. तसेच, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपावरही निशाणा साधला.

उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर हल्लाबोल

- Advertisement -

“अमित शाह यांना सांगतो, तुम्हाला जमीन म्हणजे काय असते तो माझा महाराष्ट्रातला माणूस दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही”, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आव्हान दिले.

- Advertisment -