Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र मद्यधुंद चालकामुळे तीन वाहने एकमेकांवर धडकली, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू

मद्यधुंद चालकामुळे तीन वाहने एकमेकांवर धडकली, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू

Subscribe

जुन्नर – अहमदनगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन चिमुकल्यांसह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मद्यधुंद पिकअप चालकामुळे हा अपघात झाला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

अहमदनगर कल्याण महामार्गावर लवणवाडी येथे एका पिकअपने दोन दुचाकींसह आठ जणांना चिरडले. रात्रीच्या गडद अंधारात हा अपघात झाला. तिन्ही वाहने एकमेकांना आदळल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात एका लहान मुलीचा आणि एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर, सहाजण गंभीर जखमी होते. या जखमींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करत असतानाच तिघांचा मृत्यू झाला. तर, तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये दोन चिमुकल्यांसह २ पुरूष आणि एका महिलेचाही समावेश आहे.

- Advertisement -

हेही वाचा -समृद्धी महामार्ग की अपघातांचा मार्ग; 100 दिवसांत 31 जणांनी गमावला जीव

अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी तत्काळ मदत करत जखमींना रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर, पोलिसांना पाचारण करून अपघाताची माहिती देण्यात आली. पोलिसांनी मद्यधुंद पिकअप चालकाला ताब्यात घेतले आहे. तर, गंभीर जखमी असलेल्या तिघांवर सध्या उपचार सुरू आहेत. या अपघाताची आळेफाटा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – पुण्यात खासगी बसला अपघात; चालकाचे नियंत्रण सुटल्याने १५ फूट खाली कोसळली बस

- Advertisment -