शेजारीच ठरला वैरी; चोरीसाठी घरात घुसला अन केली महिलेची हत्या

महिला ठार, मुलगा गंभीर जखमी

Sexual harassment, ransom case filed against 8 lawyers in Marine Drive

चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या एकास हटकल्याने त्याने तीनजणांवर प्राणघातक केला. या हल्ल्यात एक महिला ठार झाली असून तिचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी चोरट्यास अटक केली आहे. ही घटना देवळा तालुक्यातील देवपुरपाडे येथे गुरूवारी (दि.११) पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली. जिजाबाई विजय जोंधळे (५०) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. मुलगा संदीप विजय जोंधळे (२७) व सून राणी संदीप जोंधळे (२४) अशी जखमींची नावे आहेत. अंकलेश अरुण गांगुर्डे (वय १९) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

देवपुरपाडे येथील चिंचमळा शिवार येथील संशयित अंकलेश अरुण गांगुर्डे (वय १९) याने गुरूवारी (दि.११) पहाटे पाच वाजेच्या सुमारास जोंधळे यांच्या घरात चोरी करण्यासाठी घुसला. त्याने शेतकरी विजय छबू जोधळे यांच्या पत्नी जिजाबाई विजय जोंधळे (५०) यांच्यावर कुर्‍हाडीने हल्ला केला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्याने मुलगा संदीप विजय जोंधळे (२७) व सून राणी संदीप जोंधळे (२४) यांच्यावरही हल्ला केला. त्यात संदीप गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मालेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच देवळा पोलिसानी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संशयित आरोपी अंकलेश गांगुर्डे याला अटक केली आहे. याप्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनीही घटनास्थळाची पाहणी केली आहे.