घरट्रेंडिंगरागाच्या भरात आईनेच घेतला चिमुरड्याचा जीव!

रागाच्या भरात आईनेच घेतला चिमुरड्याचा जीव!

Subscribe

नांदेडमधील मालटेकडी भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. रागाच्या भरात एका आईनेच आपल्या तीन वर्षीय चिमुकल्याचा गळा आवळला आहे. चिमुकल्याचा गळा आवळल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्या निष्ठूर आईने आपल्या मुलाचा मृतदेह गटरात फेकला. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला आहे.

नांदेड शहरातील सांगवी परिसरातील बाबनगर भागात राहुल कोंडिबा गहुबळे हे वाहन दुरुस्तीचा व्यवसाय करतात. गुरुवारी कामानिमित्त बाहेर गेले असता त्यांची पत्नी कांचन गहुबळे हिने रागाच्या भरात आपला तीन वर्षीय मुलगा दिवेश याचा गळा आवळून खून केला. आपल्या घरच्या मंडळींना काही माहिती होऊ नये यासाठी तीन वर्षीय चिमुकला दिवेश याचा मृतदेह मालटेकडी भागातील रेल्वे पुलाखाली गटारात टाकून दिले.

- Advertisement -

राहुल गहुबळे परत आल्यावर त्यांना हा प्रकार समजला. त्यांनी लगेचच विमानतळ पोलिस स्थानकात तक्रार दाकल केली. यावरुन विमानतळ पोलिसांनी आरोपी कांचन गहुबळे हिच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -