घरमहाराष्ट्रएसटीत टिक-टॉक योग्य नाही

एसटीत टिक-टॉक योग्य नाही

Subscribe

महानगरच्या वृत्तांची परिवहन मंत्र्यांकडून दखल

एसटी महामंडळाने एसटी कर्मचार्‍यांना ऑन डयुटी मोबाईल वापरास बंदी घातलेली आहे.तरी सुध्दा अनेक कर्मचार्‍यांनी सुप्रसिद्ध गाण्यांवर नाचण्याचे तर कोणी गाणे गात असल्याचे गमतीदार व्हिडियो तयार केले आहेत. सध्या हे मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचे धुमाकूळ घालत आहेत.

या संबंधी वृत्त दैनिक ‘आपलं महानगर’ने प्रकाशित केले होती. याची दखल परिवहन मंत्री अनिल परब यांनी घेतली आहे. मोबाईल वापरत चालक एसटी चालवत असले तर योग्य नाही. याची माहिती घेऊन याची चौकशी करु,असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

टिकटॉकची क्रेझ सध्या चांगलीच वाढत आहे. फेसबुक,ट्विटर, इंस्टाग्राम या प्रकारच्या सगळ्या सोशल मीडियावर सध्या एसटी कर्मचार्‍यांचा टिकटॉक व्हिडीओचा बोलबाला आहे. या व्हिडिओखाली लाईक्स आणि कॅमेंटसुध्दा मिळत आहेत. नुकताच एक एसटीच्या वाहकांनी एसटी ब्रेक डाऊन झाल्यावर वेळ मिळाला होता.या फावल्या वेळेत ‘मुकाबला ओ मुकाबला ’ या गाण्यावर गमतीदार डॉन्स केला.तर एकाने इंदुरकर महाराजांचा ऑडिओद्वारे कर्मचार्‍यांची वेतन समस्या मांडली आहे. हे व्हिडीओ टिकटॉकवर अपलोड होताच, तुफान व्हायरल झाले आहेत.

इमारत सुरक्षा पहावी लागेल

राज्यभर रस्ते सुरक्षा नियमाचे धडे देणारा परिवहन विभाग स्वत:च असुरक्षित झाला आहे.परिवहन आयुक्त कार्यालयात आयुर्मान संपलेल्या लिफ्टने प्रवास होत असल्याची धक्कादायक माहिती दैनिक ‘आपलं महानगर’च्या हाती आली आहे.परिवहन आयुक्त कार्यालयात चार लिफ्टचे आयुर्मान संपल्याने त्या भंगारात पाठवण्याचा प्रस्ताव याआधीच प्रशासनाकडे पडून आहे. याची दखलसुद्धा विभागाकडून घेण्यात येत नव्हती. जेव्हा स्वत:उपपरिवहन आयुक्त आणि परिवहन कार्यालयातीन कर्मचारी या लिफ्टमध्ये अडकले, तेव्हा याची माहिती समोर आली आहे. यासंबंधी सुध्दा वृत्त दैनिक ‘आपलं महानगर’ने प्रकाशित केले होते. यावर सुध्दा परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब परिवहन आयुक्त कार्यालयात कर्मचार्‍यांची सुरक्षा महत्वाची आहे.त्यामुळे इमारतीची सुरक्षेसाठी रस्ते सुरक्षा सप्ताहाप्रमाणे इमारत सुरक्षा पहावी लागेल,असे अनिल परब यांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -