घरमहाराष्ट्रतीन वर्षांसाठी वाघनखं भारतात आणणार, मुंबईत 'या' वस्तूसंग्रहालयात ठेवण्यात येणार

तीन वर्षांसाठी वाघनखं भारतात आणणार, मुंबईत ‘या’ वस्तूसंग्रहालयात ठेवण्यात येणार

Subscribe

छत्रपती शिवाजी महाराज यांचे युद्धकालीन शस्त्र असलेली वाघनखं ब्रिटनच्या विक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियममधून भारतात परत आणण्याबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी सुधीर मुनगंटीवार लंडन येथे पोहोचले आहेत.

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांचे युद्धकालीन शस्त्र असलेली वाघनखं ब्रिटनच्या विक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियममधून भारतात परत आणण्याबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी सुधीर मुनगंटीवार लंडन येथे पोहोचले आहेत. उद्या बुधवारी (ता. 04 सप्टेंबर) लंडनमध्ये याबाबतचा सामंजस्य करार पार पडणार आहे. त्यानंतर पुढील महिन्यात 16 तारखेला ही वाघनखे भारतात येणार आहेत. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार हे एकटेच या करारासाठी लंडनला गेलो नसून मुख्यमंत्र्यांचे तसेच सांस्कृतीक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, पूरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, विशेष कार्यकारी अधिकारी अमोल जाधव हे देखील लंडनला गेले आहेत. (tiger nails will be brought to India for three years, and will be kept in this museum in Mumbai)

हेही वाचा – लेखक राजन खान यांच्या मुलाने संपवलं आयुष्य; सुसाइड नोटमधून कारण आले समोर

- Advertisement -

भारत सरकार आणि लंडनमधील सरकारमध्ये सामंजस्य करार झाल्यानंतर संबंधित म्युझियमकडून ही वाघनखे महाराष्ट्रात आणण्यासाठी मूल्यांकन करण्यात येणार असून त्यासाठीचा होणारा खर्च हा सरकारला कळविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याशिवाय 25 ते 30 ऑक्टोबर या कालावधीत या विषयीची विम्याची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर या करारनाम्याचा एकंदरित मसुदा तयार करण्यात येईल आणि हा मसुदा म्युझियमकडून राज्य सरकारला पाठविला जाईल.

महत्त्वाची बाब म्हणजे, ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर 15 नोव्हेंबरला अंतिम करारनाम्यावर स्वाक्षरी करण्यात येईल. ज्यानंतर 16 नोव्हेंबरला ही वाघनखे मुंबईच्या विमानतळावर येतील. पण मुंबईकरांना या वाघनखांना प्रत्यक्षात पाहण्यासाठी 2025 ची वाट पाहावी लागणार आहे. कारण 15 नोव्हेंबर 2025 ला ही वाघनखे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत. 11 महिने म्हणजेच 16 ऑक्टोबर 2026 पर्यंत ही वाघनखे मुंबईतील वस्तुसंग्रहालयात ठेवल्यानंतर ती पुन्हा लंडनमधील व्हिक्टोरिया अॅण्ड अल्बर्ट म्युझियममध्ये ठेवण्यासाठी रवाना होतील.

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराज यांचे युद्धकालीन शस्त्र असलेली वाघनखे पुढच्या महिन्यात जरी मुंबईत येणार असली तरी नागपूर, कोल्हापूरकरांना देखील या वाघनखांचे दर्शन करता येणार आहे. ही वाघनखे आधी सातारा येथे नेण्यात येणार आहेत. त्यानंतर 15 ऑगस्ट 2024 रोजी नागपूर येथील सरकारी वस्तूसंग्रहालयात ठेवण्यात येतील. नंतर ही वाघनखे कोल्हापूर येथील वस्तूसंग्रहालयात 15 एप्रिल 2025 रोजी नागरिकांना पाहण्याकरिता ठेवण्यात येणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -