निर्भया प्रकरण : पवनच देणार पवनला फाशी

Tihar-Jail-new-delhi
दिल्ली निर्भया प्रकरण

दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने चारही दोषींनामृत्यूदंड जारी केला आहे. त्यानुसार विनय कुमार शर्मा, पवनकुमार गुप्ता, मुकेश सिंग आणि अक्षय चार दोषींना २० मार्च रोजी फाशी देण्यात येणार आहे.निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना २० मार्चला सकाळी फाशी देण्यासाठीच्या तयारीला आता वेग आला आहे. तिहार जेलमध्ये फाशी देणाऱ्या जल्लादाकडून आज दिवसभरात फाशीसाठीचे ट्रायल करण्यात येणार आहेत. तिहार जेल क्रमांक ३ मध्ये ही ट्रायल आजपासून सुरू करण्यात येणार आहे. यासाठी जल्लाद म्हणून फाशीची देणारा पवन हा आज तिहार जेलमध्ये दाखल होणार असल्याची माहिती आहे.

डमी ट्रायलची तयारी सुरू

तिहार जेल प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार २० मार्चला होणाऱ्या फाशीची शिक्षेची तयारी आता पुर्ण करण्यात आली आहे. आज दिवसभरात जल्लाद पवन हा तिहार जेलमध्ये पोहचल्यानंतर डमी ट्रायलला सुरूवात होईल. आज रात्रीपर्यंत ही डमी ट्रायल काही ठराविक टप्प्यात घेण्यात येणार आहे. तर फाशीच्या शेवटच्या ट्रायलसाठी जेल अधिकारी, लोक निर्माण विभागाचे अधिकारीही हजर राहणार असल्याची माहिती आहे. जेल अधिकाऱ्यांनीही याआधीच फाशी देण्यात येणाऱ्या ठिकाणाचे निरीक्षण पुर्ण केले आहे.

दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याकांडातील दोषी मुकेश सिंगने फाशीपासून बचाव व्हावा म्हणून नविन युक्ती केली होती. आरोपी मुकेशने आपल्या वकिल एमएल शर्माच्या माध्यमातून न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. १६ डिसेंबर २०१२ रोजी झालेल्या घटनेवेळी मी नव्हतो असा दावा करणारी याचिका न्यायालयात दाखल केली होती. मात्र, ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. येत्या२० मार्च रोजी निर्भयाच्या आरोपींना फाशी होणार आहे.