तिरुपती अपघात : सोलापुरातील मृतकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत

तिरुपती येथे दर्शनासाठी गेलेल्या सोलापूर येथील भाविकांच्या वाहनाला बुधवारी अपघात झाला. त्यात सोलापूर येथील पाच तरुणांचा मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले. या अपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.

तिरुपती येथे दर्शनासाठी गेलेल्या सोलापूर येथील भाविकांच्या वाहनाला बुधवारी अपघात झाला. त्यात सोलापूर येथील पाच तरुणांचा मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले. या अपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. तसेच, जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. (Tirupati accident 5 lakh each to the families of the dead youths in Solapur)

नेमकी घटना काय?

सोलापूर शहराच्या परिसरात राहणाऱ्या आठ ते नऊ जणांचा ग्रुप तिरुपतीला बालाजीच्या दर्शनासाठी गेले होते. देवदर्शन झाल्यानंतर हे सर्वजण तवेरा गाडीतून परतीच्या प्रवासाला निघाले होते. या प्रवासात तिरुपती जिल्ह्यातील चंद्रगिरी मंडळाजवळच्या एका गावाजवळ त्याच्या गाडी दुभाजकाला धडकल्याने भीषण अपघात झाला.

या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर चार जण गंभीर जखमी झाल्याचं सुत्रांकडून मिळालेल्या माहितीवरुन समजते. या जखमींना तिरुपती इथल्या शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दरवर्षी हे मित्र आंध्रप्रदेश येथील तिरुपती बालाजीला दर्शनासाठी जात होते. २३ जानेवारीला देखील या सर्व मित्रांनी बालाजीला जाण्याचे नियोजन केले होते. टवेरा कार घेऊन ते निघाले आणि सुखरूप बालाजीला पोहोचले होते. मात्र दर्शन घेऊन परत येताना भीषण अपघात झाला. व्हीव्हीपी इंजिनिअरिंग महाविद्यालयातून या तरुणांनी शिक्षण पूर्ण केले आहे. जुळे सोलापुरातील जानकी नगर या एकाच गल्लीत सर्व मित्रांचे घर आहे. या अपघाताने गुरुवारी दिवसभर जानकी नगर परिसरात शोककळा पसरली होती.


हेही वाचा – प्रजासत्ताक दिनी न्यायहक्कासाठी दोघांचा आत्महत्येचा प्रयत्न; वाचा नेमके प्रकरण काय?