घरमहाराष्ट्रTISSने हे असले धंदे बंद करावेत, बीबीसी माहितीपटासंबंधी आमदार आशिष शेलार यांचा...

TISSने हे असले धंदे बंद करावेत, बीबीसी माहितीपटासंबंधी आमदार आशिष शेलार यांचा इशारा

Subscribe

मुंबई : दिल्ली आणि कोलकाता पाठोपाठ आता मुंबईत बीबीसी डॉक्युमेंट्रीच्या स्क्रीनिंगवरून आणखी एक वाद निर्माण झाला आहे. आज, शनिवारी मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) येथे या माहितीपटाच्या स्क्रीनिंगची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, संस्थेने यास परवानगी दिलेली नाही. यावरून भाजपा संतप्त झाली असून TISS ने हे असले धंदे बंद करावेत, असा इशारा भाजपा आमदार आशिष शेलार यांनी दिला आहे.

बीबीसी या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीने ‘इंडिया : द मोदी क्वेश्चन’ नावाचा दोन भागांचा माहितीपट युट्यूबवर प्रसारित केल होता. या माहितीपटात 2002मध्ये गुजरातमध्ये घडलेल्या गोध्रा हत्याकांड आणि त्यानंतरच्या जातीय दंगलींवरून नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. केंद्र सरकारने हा माहितीपट युट्यूबवरून हटविला आहे. पण आता टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसने (TISS) या माहितीपटाच्या स्क्रीनिंगची घोषणा केली आहे. तथापि, संस्थेने त्यासाठी परवानगी दिलेली नाही.

- Advertisement -

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रोग्रेसिव्ह स्टुडंट फोरमने (PSF) बीबीसीचा हा माहितीपट कॅम्पसमध्ये दाखवण्यासाठी प्रशासनाकडे परवानगी मागितली होती. TISSने या माहितीपटाच्या स्क्रीनिंगला परवानगी देण्यास स्पष्टपणे नकार दिला. परवानगी न मिळाल्याने फोरमने शनिवारी (28 जानेवारी) सायंकाळी 7 वाजता माहितीपट दाखवण्याचे जाहीर केले आहे. व्यवस्थापनाच्या नकारानंतरही आम्ही कॅम्पसमध्ये हा माहितीपट दाखवू, असे पीएसएफने म्हटले आहे.

- Advertisement -

यावर भाजपा संतप्त झाली आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी याबाबत ट्वीट केले आहे. बीबीसीच्या बोगस डॉक्युमेंट्रीचा शो करून मुंबई आणि महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) बिघडू पाहतेय. TISSने हे असले धंदे बंद करावेत!! पोलिसांनी तातडीने त्यावर बंदी घालावी अन्यथा आम्ही घ्यायची ती भूमिका घेऊ, असा इशारा आमदार शेलार यांनी दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -