ठामपाचा दिल्लीत ‘स्कॉच’ पुरस्काराने गौरव

इंडीया गव्हर्नन्स फोरमच्यावतीने राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये “स्कॉच स्टेट ऑफ गव्हर्नन्स रिपोर्ट -२०२१ ” या श्रेणीत ठाणे महानगरपालिका राष्ट्रीय स्तरावर अव्वल ठरली असून स्टार ऑफ गव्हर्नस स्कॉच अवॉर्ड इन “म्युनिसिपल गव्हर्नस” राष्ट्रीय पुरस्काराने ठाणे महापालिकेस गौरविण्यात आले आहे. दिल्ली येथे संपन्न झालेल्या विशेष समारंभात महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्यावतीने स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त(१) संदीप माळवी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

स्कॉच पुरस्कार मिळणारे महाराष्ट्रातील ठाणे हे एकमेव शहर ठरले आहे. स्कॉच’ या संस्थेच्यावतीने राष्ट्रीय स्तरावर ही स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत ठाणे महानगरपालिकेने सहभाग घेतला होता. या स्पर्धेच्या “स्कॉच स्टेट ऑफ गव्हर्नन्स रिपोर्ट -२०२१” या श्रेणीमध्ये ठाणे महानगरपालिका राष्ट्रीय स्तरावर अव्वल ठरली. त्यासाठी स्टार ऑफ गव्हर्नस स्कॉच अँवॉर्ड इन “म्युनिसिपल गव्हर्नस” हा इंडीया गव्हर्नन्स फोरमचा राष्ट्रीय स्तरीय पुरस्कार ठाणे महानगरपालिकेने पटकाविला आहे.

स्कॉच पुरस्काराकरिता निवड प्रक्रिया अतिशय काटेकोर असून प्रकल्पांचे मुल्यांकन सादरीकरणाच्या आधारे ज्युरीकड़ून केले जाते. यंदा राष्ट्रीय स्तरावील स्कॉच पुरस्कार मिळवणारी ठाणे महानगरपालिका राज्यातील एकमेव महानगरपालिका ठरली आहे.


हेही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाची बैठक संपन्न; ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा