शिवाजी महाराजांचा अपमान विसरण्यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना स्क्रिप्ट दिलीय, संजय राऊतांचा घणाघात

सीमावादामागे फार मोठं षडयंत्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान झालाय. भगतसिंह कोश्यारी, सुंधाशू त्रिवेदी यांनी शिवाजी महाराजांवर चिखलफेक केली, यामुळे महाराष्ट्रात सरकारविरोधात संतापाची लाट उसळली आहे. त्यावरील लक्ष विचलित व्हावं, शिवाजी महाराजांचा विसर पडाावा म्हणून बोम्माईंना पुढे करून सीमावाद निर्माण केलाय, असं संजय राऊत म्हणाले.

shivsena mp sanjay raut warn bjp

मुंबई – शिवाजी महाराजांचा अपमान लोकांनी विसरावा म्हणून कर्नाटक सीमावाद (Maharashtra Karnatak Border conflict) सुरू आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना बोलणं ही एक ठरलेली स्क्रिप्ट आहे, असा घणाघात शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा – … अन्यथा महाराष्ट्राचं नवं महाभारत घडेल, सीमावादावरुन संजय राऊतांचा सरकारला इशारा

लोकांचं चित्त विचलित करावं म्हणावं म्हणून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना लिहून दिलेली स्क्रिप्ट ते वाचत आहेत, असा हल्लाबोल राऊतांनी केला. भाजपाचा कोणताच मुख्यमंत्री त्यांच्याच पक्षाच्या राज्यावर अटॅक करत नाहीत. भाजप एक शिस्तबद्ध पक्ष आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना बोलणं ही एक ठरलेली स्क्रिप्ट आहे. महाराष्ट्राची एक इंचही भूमी आम्ही जाऊ देणार नाही. सरकार सोडून द्या, ते दुबळे आहेत. पण शिवसेना आहे. बाळासाहेब ठाकरेंनी तीन महिने तुरुंगवास भोगला, १६९ हुतात्मे दिले आहेत. आताही आम्ही तुरुंगात जायला तयार आहोत, असं संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्राचं नवं महाभारत घडेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

सीमावादामागे फार मोठं षडयंत्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान झालाय. भगतसिंह कोश्यारी, सुंधाशू त्रिवेदी यांनी शिवाजी महाराजांवर चिखलफेक केली, यामुळे महाराष्ट्रात सरकारविरोधात संतापाची लाट उसळली आहे. त्यावरील लक्ष विचलित व्हावं, शिवाजी महाराजांचा विसर पडाावा म्हणून बोम्माईंना पुढे करून सीमावाद निर्माण केलाय, असं संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा – ‘वृद्धाश्रमातही जागा नाही, असे राज्यपाल…’; उद्धव ठाकरेंचा कोश्यारींना टोला

मुंबईतील मराठी माणसाविरोधात राज्यपाल बोलले तेव्हा लक्ष विचलित करण्यासाठी संजय राऊतांना अटक झाली. आता छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय विसरण्यासाठी सीमावाद बाहेर काढला आहे. शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. सगळ्यात मोठ्या लढाईसाठी आम्ही तयार आहोत. ती लढाई कोणत्याही ठराला जाईल, असंही संजय राऊत म्हणाले.