घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रआमची गद्दारी बाळासाहेबांचे विचार जपण्यासाठी : मंत्री गुलाबराव पाटील

आमची गद्दारी बाळासाहेबांचे विचार जपण्यासाठी : मंत्री गुलाबराव पाटील

Subscribe

नाशिक : इगतपुरी येथील पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन रविवारी (दि. २६) पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी बोलताना मंत्री पाटील म्हणाले की, येथील राजकीय पक्षांची खरचं कलाकारी आहे. सर्वपक्षीय नेते एकाच व्यासपीठावर आहे. आम्ही गद्दार आहोत तर आहे, आमची गद्दारी आहे ती बाळासाहेबांची विचार जपण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलले आहे, त्यामुळेच आम्ही गद्दारी केली. आतापर्यंत फक्त हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कृपेने मी आज मंत्री आहे.

महाविकास आघाडी आणि आमचं लव्ह मॅरेज होत ते तुटलं आणि आम्ही भाजपबरोबर गेलो. त्यानंतर आमच्यावर अनेक टीका झाल्या. मात्र तरीही आम्ही विकास कामे करणारच आणि घोटीतील ही पहिली योजना आहे की भूमिपूजनाच्या उद्घाटनाच्या आधीच पहिली सहा किलोमीटर पाईपलाईन सुरू केली आहे. निवडणुका येतील अन् जातील म्हणून प्रारब्धात असेल तर आमदार, खासदार होऊ. त्यामुळे आम्हाला कोणी कीतीही बदनाम केले तरी हरकत नाही. त्यामुळे जो काम करेल त्याला जनता लक्षात ठेवते, आम्ही जे करतो ते जनतेसाठी करतो. त्यामुळे घोटीचा तीस वर्षे पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. घोटी येथे पाणीपुरावठा योजनेचे भूमिपूजन पाणीपुरावठामंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले त्याप्रसंगी ते बोलत होते.

- Advertisement -

गतिशील सरकार म्हणून महाराष्ट्रातील सरकार आहे. जिल्ह्यात या सरकारने भरघोस निधी दिला असून यापुढे हे सरकार विकासात्मक कामे होतील असे मनोगत खासदर हेमंत गोडसे यांनी व्यक्त केले. इगतपुरी तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ समजल्या जाणार्‍या घोटीकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला पाणी प्रश्न दूर व्हावा म्हणून भावली धरणातून पाणीपुरवठा योजना व्हावी यासाठी घोटी ग्रामपालिका, माजी आमदार निर्मला गावित यांच्यासह तालुका उपप्रमुख कुलदीप चौधरी यांनीही सतत केलेल्या पाठपुरव्याला आज यश येऊन या पाणीपुरावठा योजनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सदस्य संजय आरोटे तर आभार रामदास भोर यांनी मानले. यावेळी घोटी ग्रामपालिकेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी खासदार हेमंत गोडसे, संभाजीनगरचे आमदार संजय शिरसाठ, आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, शिवराम झोले, पांडुरंग गांगड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत घोटी ग्रामपालिकेचे सरपंच गणेश गोडे, उपसरपंच श्रीकांत काळे, ग्रामपालिका सदस्य रामदास भोर, संजय आरोटे, संजय जाधव, सचिन गोणके, रवींद्र तारडे, भास्कर जाखेरे, सौ. स्वाती कडू, अरूणा जाधव, रुपाली रुपवते, कोंड्याबाई बोटे, वैशाली गोसावी, सुनंदा घोटकर, सुनिता हर्षल घोटकर, अर्चना घाणे, मंजुळा नागरे, ग्रामविकास अधिकारी रवींद्र धुंदाळे यांनी केले.

- Advertisement -

कार्यक्रमाला जिल्हा उपप्रमुख निवृत्ती जाधव, जि. प. सदस्य उदय जाधव, गोरख बोडके, आगरी सेनेचे गणपतराव कडू, तालुका प्रमुख भगवान आडोळे, उपतालुका प्रमुख कुलदीप चौधरी, तालुका अध्यक्ष संपतराव काळे, जैन समाजाचे अध्यक्ष नंदू शिंगवी, सुनील जाधव, कल्पेश भगत, अनिल काळे, गणेश काळे, भगीरथ मराडे, हरीश्चंद्र चव्हाण, धामणीचे उपसरपंच गौतम भोसले, अ‍ॅड. नंदू वालझाडे, संजय जाधव, संदीप सहाणे, आण्णा डोंगरे, रामदास शेलार, संतोष दगडे, सुरेश कडू, नंदलाल पिचा, जगन भगत, हेमंत सुराणा, मुलचंद भगत, देवराम म्हसणे, गणेश कडू, कैलास भगत, विकास जाधव आदी उपस्थित होते.

एकाच व्यासपीठावर सर्वपक्षीय नेते

इगतपुरी तालुक्याचे राजकारण कसे आहे हे अद्यापही मला समजले नाही. एकाच व्यासपीठावर सर्व नेते उपस्थित असून जणू काही हे सर्व भाऊच आहेत असे मला वाटते. त्यामुळे गावाचा विकास करताना सर्वांनी एकजुटीने काम करून अंतर्गत राजकारण करू नये. त्यामुळे मी तुमच्या विभागाचा आमदार जरी नसलो तरी माझ्याकडून देखील तुम्हाला विकास निधी दिला जाईल. त्यामुळे विकास करताना विचार करू नका असे मनोगत संभाजीनगरचे आमदार संजय शिरसाठ यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -