घरमहाराष्ट्रमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर

Subscribe

या दौऱ्यात ते अॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो २०२० या प्रदर्शनाचे उद्घाटन करणार आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज औरंगाबादचा दौरा करणार आहेत. विशेष म्हणजे, मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे हे औरंगाबादमध्ये जात आहेत. या दौऱ्यात ते अॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो २०२० या प्रदर्शनाचे उद्घाटन करणार आहेत. आज दिवसभराच्या व्यस्त वेळापत्रकानंतर ते औरंगाबादमध्येच मुक्काम करणार आहेत.

असा असेल मुख्यमंत्र्यांचा दौरा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज ९ जानेवारी रोजी सकाळी १०.४० वाजता औरंगाबाद विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर सकाळी १०.४५ वाजता उद्धव ठाकरे हे मोटारीने कलाग्राम, चिकलठाणा एमआयजीसीकडे मार्गस्थ होतील आणि सकाळी १०.५५ वाजता ते तिथे पोहोचतील. त्यानंतर सकाळी ११ वाजता अॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो २०२० प्रदर्शनाचे उद्घाटन पार पडेल. दुपारी १२.३० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मोटारीने विभागीय आयुक्त कार्यालयाकडे निघतील. त्यानंतर दुपारी १ वाजता उस्मानाबाद जिल्हा आढावा बैठक पार पडेल. त्यानंतर दुपारी ३ वाजता औरंगाबाद महापालिकेच्या प्रश्नांवर बैठक होईल. त्यानंतर सायंकाळी ४.१५ वाजता मुख्यमंत्री औरंगाबाद जिल्हा आढावा बैठकीला उपस्थित राहतील. सायंकाळी ५.३० वाजता परभणी जिल्हा आढावा बैठक पार पडेल. संपूर्ण दिवसभराच्या व्यस्त वेळापत्रकानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे औरंगाबादमध्येच मुक्काम करणार आहेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -