मुंबई – पुणे एक्स्प्रेस वे आज बंद

मुंबई – पुणे एक्स्प्रेस वे आज दुपारी अर्धा तास बंद राहणार आहे.

today Mumbai pune expressway are closed for half an hour
मुंबई – पुणे एक्स्प्रेस वे आज बंद

मुंबई – पुणे एक्स्प्रेस वे आज, मंगळवारी दुपारी अर्धा तास बंद राहणार आहे. महावितरणची उच्चदाब क्षमतेची वीज वाहिनी टाकण्यासाठी दुपारी एक ते दीड यावेळेत दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. महामार्गावर परंदवाडी येथे महावितरणच्या उच्चदाब क्षमतेच्या वीजवाहिनीमध्ये झालेल्या बिघाडाच्या दुरुस्तीसाठी वाहतूक अर्धा तास बंद ठेवण्यात येणार आहे.

पर्यायी मार्ग

मुंबईहून पुण्याकडे आणि पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक अर्ध्या तासासाठी बंद करण्यात येणार आहे. परंदवाडीपासून अर्ध्या तासासाठी बंद करण्यात येणार आहे. परंदवाडीपासून अर्धा किलोमीटर अंतरावरील सर्व प्रकारची अवजड, माल वाहतूक करणारी वाहने थांबविण्यात येणार आहेत. मुंबईकडे जाणारी हलकी आणि प्रवासी वाहने किवळे पुलापासून जुन्या पुणेमुंबई महामार्गावरून वळविण्यात येणार आहेत. तसेच, पुण्याकडे येणारी हलकी, चारचाकी तसेच प्रवासी वाहने ही उर्से टोलनाका येथून जुन्या पुणेमुंबई मार्गावर वळविण्यात येणार असल्याची माहिती महामार्ग पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी दिली आहे.