Temple Reopen: राज्यातील मंदिरे आजापासून भविकांसाठी खुली, मुख्यमंत्री सहकुटुंब घेणार मुंबादेवीचे दर्शन

मुंबादेवी हे मुंबईकरांचे आराध्य दैवत आहे. त्यामुळे मुंबादेवी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होण्याची शक्यता

कोरोनाच्या काळात बंद झालेली राज्यभरातील धार्मिक स्थळे आज तब्बल दीड वर्षांनी पुन्हा एकदा भविकांसाठी खुली करण्यात आली आहेत.(Today Temple Reope in Maharashtra) आज पासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात झाली आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला. सरकारच्या नियमांचे पालन करुन राज्यातील मंदिरे भाविकांसाठी खुली करण्यात आली आहेत. राज्यातील अनेक महत्त्वाच्या प्रार्थनास्थळी भाविकांनी दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवाचे दर्शन मिळाल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्याच्या पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे तसेच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि उपमहापौर सुहास वाडकर हे सकाळी ८:३० वाजता मुंबईच्या मुंबादेवीचे दर्शन घेणार आहेत.

मुंबादेवीचे दर्शन घेण्यासाठी मंदिराच्या वेबसाईटवर ऑनलाईन बुकींग करुन भविकांना दर्शन दिले जाणार आहे. मुंबादेवी हे मुंबईकरांचे आराध्य दैवत आहे. त्यामुळे मुंबादेवी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंदिरात रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे त्याचप्रमाणे मंदिर आणि पोलीस प्रशानाकडून मंदिरात आणि मंदिर बाहेरिल परिसरात कडेकोड बंदोबस्त करण्यात आला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सकाळी सात वाजता मुंबईच्या श्री सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन घेतले. शारदीय नवरात्र उत्सावाच्या त्यांनी सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन आजच्या दिवसाची सुरुवात करत असल्याचे अजित पवार म्हणाले. ‘गर्दी टाळण्यासाठी मी पहाटेच दर्शन घेतले. मंदिरे उघडली असली तरी भाविकांनी दर्शनासाठी येताना सर्व नियमांचे पालन करावे’, असे आवाहन अजित पवार यांनी केले

तुळजापूरच्या तुळजापूर मंदिरात देखील देवीची पहाटे यथासांग पुजा करुन मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. शारदीय नवरात्र उत्सवात तुळजापूर मंदिरात दररोज १५ हजार भाविकांना दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे. नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून मंदिराच्या प्रवेशद्वारावर ‘आईसाहेब’ असे लिहिण्यात आले आहे.

 

पंढपूरचे विठ्ठल मंदिर तब्बल ८ महिन्यांनी भविकांसाठी खुले करण्यात आले. पंढपूरच्या विठ्ठल मंदिराला सुंदर फुलांची आरास करण्यात आली असून संपूर्ण मंदिर रंगीबेरंगी फुलांनी फुलून गेले आहे. तुळशीची पाने, झेंडू,गुलाब, अष्टर,शेवंती,जरबेरा,कागडा,कामिनी यासारख्या विविध फुलांनी विठ्ठल मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे.


हेही वाचा – पहाटे ५ ते रात्री १० या वेळेत मिळणार भगूरच्या रेणुका देवीचं दर्शन