घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रचिमुकल्याचा मॅजिकबॉल गिळल्याने मृत्यू; पत्नीची पतीविरोधात तक्रार

चिमुकल्याचा मॅजिकबॉल गिळल्याने मृत्यू; पत्नीची पतीविरोधात तक्रार

Subscribe

नाशिक : वारंवार सांगूनही अठरा महिन्याच्या चिमुकल्याला मॅजिक बॉल खेळायला दिला. तो मॅजिक बॉल गिळल्यामुळे चिमुकल्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी चिमुकल्याचा आईने पती विरोधात तक्रार दाखल केली आहे. चिमुकल्याचा मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी त्याचे वडील संकेत बोराडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संकेत बोराडे आणि पत्नी शीतल यांच्यात कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर ते दोघे त्यांचा अठरा महिन्याचा शिवांश यांच्यासह मोटवानीरोड भागात शांतीकृपा सोसायटीत बिभक्त राहत होते. मात्र वादाची पार्श्वभूमी असताना शिवांशचे वडील संकेत बोराडे यांनी त्याला खेळण्यासाठी छोटा पिवळ्या रंगाचा मॅजिक बॉल आणला. शीतलने संकेतला तो बॉल शिवांशने गिळला तर त्याच्या जिवाला धोका होऊ शकतो, असे वारंवार बजावले होते. विशेष म्हणजे संकेतने वैद्यकीय क्षेत्रात काम केलेले असल्याने त्याला याची माहिती असतानाही त्याने तो बॉल आणला आणि त्याला खेळायला दिला. १२ मे २२ रोजी शीतल घरात नसताना आणि संकेत बोराडे व चिमुकला शिवांश हे दोघेच घरात असताना खेळताना चिमुकल्याने मॅजिक बॉल गिळल्याने त्याची प्रकृती खालावली.

- Advertisement -

शीतल घरी आल्यानंतर शिवांश पलंगावर पडलेला आढळला. त्याला शीतल व संकेतने रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रियेमार्फत मॅजिक बॉल काढण्यात आला. मात्र, दरम्यान शिवांशच्या प्रकृतीत त्यानंतरही सुधारणा न होता त्याचा मृत्यू झाला. या घटनेला तब्बल सहा महिने उलटले आहेत. चिमुकल्याची आई शीतल हिने आता शिवांशच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या कारणास्तव पती संकेत बोराडे याच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती-पत्नीत होते वाद

सातपूर परिसरातील जाधव संकुल येथील शीतल हिचा जेलरोड, नाशिकरोड येथील संकेत याच्या सोबत २०१८साली विवाह झाला होता. लग्नानंतरच त्यांच्यात वाद-विवाद सुरू झाले त्यातून मतभेद होऊन लग्नानंतर पाच ते सहा महिन्यातच ते वाद विकोपाला गेले. त्यानंतर शीतल गरोदर राहिली आणि ऑक्टोबर २०२०साली तिने मुलाला जन्म दिला. त्यानंतर २०२१साली तिच्या सासरच्यांनी तिला पुन्हा सासरी आणले. त्यानंतर कौटुंबिक न्यायालयाने त्यांचे समुपदेशन केल्यावर ते एकत्र राहत होते. मात्र, तरीही त्यांच्यात वादाचे खटके उडतच असल्याचीही बाब समोर आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -