घरCORONA UPDATECoronaLive Update - मुंबईत गेल्या २४ तासांमध्ये ८७ नवे कोरोनाग्रस्त, एकूण आकडा...

CoronaLive Update – मुंबईत गेल्या २४ तासांमध्ये ८७ नवे कोरोनाग्रस्त, एकूण आकडा २५०९

Subscribe

मुंबईत गेल्या २४ तासांमध्ये ८७ नवे कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले असून आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या मुंबईत २ हजार ५०९ इतकी झाली आहे. त्यासोबतच २४ तासांत ४ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा १२५वर गेला आहे. मात्र, यात दिलासादायक बाब अशी की २४ तासांमध्ये ४२ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा आता २८१ झाला आहे.

mumbai letter

- Advertisement -

देशभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा १४ हजार ३७८ वर गेला असून मृतांचा आकडा ४८० झाला आहे. गेल्या २४ तासांत ९९१ नवे रुग्ण सापडले आहेत. तसेच ४३ मृत्यूंची नोंद झाली आहे. मात्र, असं असलं, तरी आत्तापर्यंत १ हजार ९९२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. ही दिलासादायक बाब आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

- Advertisement -

अंबरनाथमध्ये सापडला कोरोनाचा नवीन रुग्ण
कोरोनाचा आणखीन एक नवीन रुग्ण अंबरनाथमध्ये आढळून आल्याने शहरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. शहराच्या पूर्व भागातील बी कॅबिन रोड जवळील एका इमरातीमध्ये हा ४४ वर्ष वयाचा रुग्ण आढळला आला आहे. त्याला मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

कल्याण डोबिवलीत एकाच दिवशी १३ रूग्ण आढळले

गेल्या दोन दिवसांपासून शहरात करोनाबाधित रूग्णांची संख्या कमी होत असतानाच, शनिवारी एकाच दिवशी १३ रूग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे, त्यापैकी १२ रूग्ण हे डोंबिवलीतील आहे तर एक रूग्ण कल्याणातील आहे. नव्या १३ रूग्णांमध्ये एका वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे. त्यामुळे कल्याण डोबिवली महापालिका क्षेत्रात करोनाबाधित रूग्णांची संख्या ७३ झाली आहे. आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला असून २६ जणांना घरी सोडण्यात आले आहे.

मुंबईतील केईएम हॉस्पिटमध्ये पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. नर्स, टेक्निशयनला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे केईएममधील २८ कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.


गेले काही दिवस लॉकडाऊनमुळे बंद असलेली टोल वसुली पुन्हा सुरू होणार आहे. २० एप्रिलपासून ही टोलवसूली करण्यात येईल. खासगी आणि व्यवसायिक  वाहनांकडून टोल वसूलू करणार


नायगाव येथील पालिकेच्या माता बाल संगोपन केंद्रातील ६ कर्मचारी कोरोनाबाधित असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये चार नर्स, दोन वॉर्डबॉय यांचा समावेश आहे. यासोबत वसई-विरारमधील करोनाबाधितांची संख्या ८१ वर पोहोचली आहे.


भारतीय नौदलाचे जवळपास १५-२० जवान कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या सर्वांना नेव्हीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. इंडियन नेव्हीमध्ये कोरोना संक्रमणाची ही पहिलीच घटना आहे. या अगोदर भारतीय लष्करातील ८ जवानांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं.


नंदुरबार शहरातील एकास कोरोना आजाराची लक्षणे दिसून आल्याने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात गुरुवारी संध्याकाळी दाखल करण्यात आले होते. या रुग्णाचा करोना चाचणी अहवाल शुक्रवारी रात्री आठ वाजता प्राप्त झाला.  जिल्ह्यातील करोनाचा हा पहिलाच रुग्ण आहे.


महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या तीन हजारांच्या पुढे गेली आहे. हा टप्पा गाठणारं महाराष्ट्र पहिलं राज्य ठरलं आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधांची संख्या ३ हजार ३२० इतकी झाली आहे. शुक्रवारी राज्यात १८ नवे रुग्ण आढळले. तर दिवसभरात ७ रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ३३१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शुक्रवारी ज्या सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान दुसरीकडे देशात कोरोनाची रुग्णवाढ मंदावली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. टाळेबंदीपूर्वी दर तीन दिवसांनी रुग्णसंख्या दुप्पट होत होती. गेल्या सात दिवसांमधील आकडेवारीनुसार हे प्रमाण आता ६.२ दिवसांवर आले असल्याचं सांगण्यात आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -