घरताज्या घडामोडीउद्यापासून 'या' तीन ठिकाणी होणार करोनाची चाचणी

उद्यापासून ‘या’ तीन ठिकाणी होणार करोनाची चाचणी

Subscribe

करोनाच्या पार्श्वभूमीवर आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुण्यातील एनआयव्ही संस्थेला भेट दिली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्यापासून करोना चाचणी करण्यासाठी तीन ठिकाणी लॅब सुरू होणार असल्याचं सांगितलं. तसंच आठ ठिकाणी लॅब सुरू करणार असल्याचा निर्णय घेतला असल्याच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदमध्ये सांगितलं. या तीन लॅब उद्यापासून कस्तुरबा हॉस्पिटल, केईम हॉस्पिटल आणि बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये सुरू होणार आहेत. याशिवाय हाफकिनच्या संचालकांशी चर्चा झाली असून लवकरच तिथे देखील दोन लॅब सुरू करणार असल्याचं टोपे म्हणाले. चार दिवसांमध्ये आठ लॅब सुरू होती. तसंच धुळे,औरंगाबाद ठिकाणी लॅब सुरू करण्याचा प्रयत्न करत आहेत. या सर्व लॅबकरिता एनआयव्हीकडून उपकरण मिळणार असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.

अशावेळीच होणार करोना चाचणी

प्रवास केला असल्यास आणि लक्षणं दिसल्यासवरच करोनाची चाचणी होईल. सर्दी किंवा खोकला असलेल्याची करोना चाचणी केली जाणार नाही, असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. नायडू आणि वायपीएम रुग्णालयात ६० आयसोलेटेड बेडसची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय खासगी रुग्णालयांना आयसोलेशन बेडस ठेवणे बंधनकार करण्यात आलं आहे. सध्या नायडू रुग्णालयात आठ आणि वायसीएम रुग्णालयात १० करोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण १८ करोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

राज्यात करोनाची संख्या ४२वर 

पिंपरी-चिंचवड १०
पुणे ८
मुंबई ७
नागपूर ४
कल्याण ३
नवी मुंबई ३
यवतमाळ ३
ठाणे १
रायगड १
अहमनगर १
औरंगाबाद १


हेही वाचा – Coronavirus: लष्कारातील जवानाला करोनाची लागण; लष्करातील पहिलीच घटना

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -