घरक्राइमपुण्यात मुलांचाही लैंगिक छळ; 'या'मुळे नग्न करुन काढले फोटो

पुण्यात मुलांचाही लैंगिक छळ; ‘या’मुळे नग्न करुन काढले फोटो

Subscribe

मागील अनेक दिवसांपासून गुन्हेगारीत पुणे शहर चर्चेत आहे. बऱ्याच गुन्ह्यांची नोंद या शहरात होत असून, अनेक गुंडाच्या टोळ्या सक्रिय आहे. नुकताच पुण्यातील तळजाई पठार परिसरातून भांडणातील मुलांची नावं न सांगितल्यामुळे गुंडांच्या टोळीने अल्पवयीन मुलाला पळवून नेत त्याचे नग्न फोटो काढल्याची घटना घडली आहे.

मागील अनेक दिवसांपासून गुन्हेगारीत पुणे शहर चर्चेत आहे. बऱ्याच गुन्ह्यांची नोंद या शहरात होत असून, अनेक गुंडाच्या टोळ्या सक्रिय आहे. नुकताच पुण्यातील तळजाई पठार परिसरातून भांडणातील मुलांची नावं न सांगितल्यामुळे गुंडांच्या टोळीने अल्पवयीन मुलाला पळवून नेत त्याचे नग्न फोटो काढल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी धनकवडीत राहणार्‍या मुलाच्या वडिलांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अभिजित पाटील ऊर्फ मायाभाई (रा. जनता वसाहत), प्रमोद कळंबे या सराईत गुंडासह त्याच्या टोळक्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना लक्ष्मीनगर येथील शाहू कॉलेज येथून सूर्या चौक आंबेगाव आणि तळजाई पार येथे गुरुवारी दुपारी 2 ते सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान घडली. (took nude photos of a minor on taljai plateau posco act in pune)

नेमके प्रकरण काय?

- Advertisement -

पुण्यातील शाहू कॉलेज परिसरात असताना गुंडांच्या टोळीने अल्पवयीन मुलाला जबरदस्तीने मोटारसायकलवर दोघांमध्ये बसवून साई सिद्धी चौकापासून सूर्या चौकात नेले. तेथून तळजाई पार येथे मोकळ्या मैदानात आणले. या मुलाला दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणांमधील मुलांची नावे विचारायला सुरुवात केली. मात्र, त्या मुलाला नावे माहिती नव्हती. त्यामुळे त्या मुलाने गुंडांना नावे माहित नसल्याचे स्पष्ट सांगितले. नावे माहित नसताना त्या मुलांना घेऊन ये असा तगादा लावला आणि धारदार हत्यार गळ्याला लावून खल्लास करुन टाकण्याची त्याला धमकी दिली. त्यावेळी मुलगा घाबरला त्यानंतर गुंडांच्या टोळीने त्याना नग्न करुन त्याचे फोटो काढले.

दरम्यान, या घडल्या प्रकारानंतर मुलगा घाबरलेल्या अवस्थेत घरी परतला. त्यावेळी त्याने घडलेली घटना वडिलांना सांगितली. वडिलांनी हा प्रकार ऐकून थेट पोलिसांत धाव घेतली. त्यावेळी पोलिसांनी कारवाई केली आणि दोघांवर गुन्हा दाखल केला. अभिजित पाटील आणि प्रमोद कळंबे हे सराईत गुंड आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – शिंदे-फडणवीसांच्या सरकारमध्ये शेतकरी दुय्यम झालाय, बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -