Tool kit प्रकरण- शंतनुचा तिकरी बॉर्डरवर आठ दिवस होता मुक्काम

बीडच्या शंतनु मुळुक याने २० ते २७ जानेवारीदरम्यान तिकरी बॉर्डरवर मुक्काम केला होता. यादरम्यान त्याने शेतकरी संघटनेच्या नेत्यांबरोबर गोपनीय बैठका केल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या हाती लागली आहे.

नवी दिल्लीतील शेतकरी आंदोलनादरम्यान चर्चेत आलेल्या tool kit प्रकरणी खळबळजनक माहिती समोर आली आहे. टूल किटच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीयस्तरावर भारताची प्रतिमा मलिन करण्याचा समाजकंटकांनी कट आखला होता. त्याचपार्श्वभूमीवर बीडच्या शंतनु मुळुक याने २० ते २७ जानेवारीदरम्यान तिकरी बॉर्डरवर मुक्काम केला होता. यादरम्यान त्याने शेतकरी संघटनेच्या नेत्यांबरोबर गोपनीय बैठका केल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या हाती लागली आहे.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचे कनेक्शन खलिस्तानी व नक्षलवाद्यांशी असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. त्यादृष्टीने या प्रकरणाचा तपास सुरू आहे. प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी शेतकरी व पोलिसांमध्ये झालेल्या संघर्षाच्या कटातही शंतनु सामील असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याच्या मोबाईलच्या लोकेशनवरून ही माहिती समोर आली आहे. मात्र अजूनतरी सायबर सेलने यावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

पर्यावरणवादी कार्यकर्ता दिशा रवी, निकिता जेकब व शंतनू या तिघांनी टूलकिट दस्ताऐवज तयार केले. नंतर  झूमवर या तिघांची मिटिंग झाली. त्यातच भारताची बदनामी करण्याचं कारस्थान रचण्यात आला असा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे

कोण आहे शंतनु?

शांतनु मुकुल हा बीडमधला असून पेशाने इंजीनियर आहे. तसेच शांतनु पोएटीक जस्टिस फाऊंडेशन (पीजेएफ)या खलिस्तानी संघटनेसाठी काम करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. शांतनुनेच शेतकरी आंदोलनासाठी तयार करण्यात आलेल्या टूलकिटमध्ये आंदोलनाची रुपरेषा तयार केली होते. जी शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यात आली. त्यानंतरच २६ जानेवारीला पोलीस व शेतकऱ्यांमध्ये संघर्ष झाला होता. त्यावेळी टि्वटरवर अनेक गोष्टीही ट्रेंड करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

केंद्र सरकारकच्या नवीन कृषी कायद्याला पंजाब व हरयाणामधील शेतकऱ्यांचा विरोध आहे. हे कायदे मागे घेण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून हे शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. यादरम्यान सरकारने अकरावेळा शेतकरी नेत्यांबरोबर चर्चा केली. पण चर्चा निष्फळ ठरल्या आहेत. यामुळे शेतकरी आक्रमक झाले असून २६ जानेवारीला शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलि काढली. पण या रॅलिला हिंसक वळण लागले होते. लाल किल्ल्यावर आंदोलक पोहचले होते. त्यानंतर अनेक ठिकाणी पोलीस व आंदोलकांमध्ये झटापट झाली. याचे तीव्र पडसाद आंतरराष्ट्रीयस्तरावरही उमटले. भारतात शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे चित्र जगभरात तयार केले गेले. रियाना, ग्रेटा थर्नबर्ग यासारख्या अनेक परदेशी सेलिब्रिटीजनी या शेतकरी आंदोलनाला पाठींबा दर्शवला. यामुळे सोशल मीडियावर भारतविरोधी ट्रेंड सुरूच झाला होता.