घरताज्या घडामोडीमुसळधार पावसाचा शेतकऱ्यांना फटका; भूस्खलनामुळे २५ ते ३० एकर भातशेतीचे नुकसान

मुसळधार पावसाचा शेतकऱ्यांना फटका; भूस्खलनामुळे २५ ते ३० एकर भातशेतीचे नुकसान

Subscribe

राज्यात सध्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच, या पूराचा फटका शेतकऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. जुन्नर तालुक्यातील तळेरान येथे सुरू असलेल्या संततधार पावसामुळे भूस्खलन झाले.

राज्यात सध्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच, या पूराचा फटका शेतकऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. जुन्नर तालुक्यातील तळेरान येथे सुरू असलेल्या संततधार पावसामुळे भूस्खलन झाले. या भूस्खलनामध्ये जवळपास २५ ते ३० एकर भातशेती गाडली गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. (Torrential rain hit farmers Landslide damage 25 to 30 acres of paddy fields)

मिळालेल्या माहितीनुसार, तळेरान हा जुन्नर तालुक्यातील आदिवासी पट्ट्यातील भाग आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. या भागातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. संततधार सुरू असल्याने या भागातील शेतकरी भाताची लावणी करत आहेत. मात्र अचानक भूस्खलन झाल्याने शेतकऱ्यांनी लावलेल्या भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

- Advertisement -

या संदर्भात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनस्थळाची पाहणी केली असून पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. तसेच नुकसाग्रस्त शेतकऱ्यांनी आम्हाला प्रशासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे.

या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर, अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे शेतकरी संकटात आल्याने या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याची गरज आहे. तळेरान येथील भूस्खलनामुळे भातशेती गाडली जाऊन झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याबाबत आदेश खासदार अमोल कोल्हे यांनी दिले.

- Advertisement -

देशभरात मान्सून सक्रिय झाला असून, पावसाने चांगलीच बॅटींग केली आहे. मागील चार दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे राज्याच्या अनेक भागांच पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता हवामान विभागाने काही जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच, नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीने नागरिकांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण स्वत: उपस्थित राहून राज्यभरातील पूरस्थितीचा आढावा घेत असल्याचे सांगितले.


हेही वाचा – राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; मुख्यमंत्र्याचे पूरस्थितीवर लक्ष

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -