सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीवर पर्यटनास बंदी; मेरीटाईम बोर्डाचा आदेश

सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील तारकर्लीमध्ये (Tarkarli) पर्यटकांनी (Tourist) भरलेली बोट समुद्रात बुडून दोन जणांचा मृत्यू झाला. या बोटीत 20 पर्यटक होते. त्यातील 16 जणांना सुखरूप वाचवले असून उर्वरीत चोघांपैकी 2 जणांचा मृत्यू झाला असून, 2 जण गंभीर जखमी झाले.

सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील तारकर्लीमध्ये (Tarkarli) पर्यटकांनी (Tourist) भरलेली बोट समुद्रात बुडून दोन जणांचा मृत्यू झाला. या बोटीत 20 पर्यटक होते. त्यातील 16 जणांना सुखरूप वाचवले असून उर्वरीत चोघांपैकी 2 जणांचा मृत्यू झाला असून, 2 जण गंभीर जखमी झाले. मात्र, या दुर्घटनेनंतर आता सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टी भागातील साहसी जलक्रीडा प्रकार तसेच किल्ला प्रवासी होडी वाहतूक सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मेरीटाईम बोर्डाच्या आदेशानुसार, 26 मे पासून 31 ऑगस्टपर्यत साहसी जलक्रीडा प्रकार तसेच किल्ला प्रवासी होडी वाहतूक सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे आता कोकणातील सिंधुदूर्ग किनारपट्टी भागातील पर्यटनही बंद होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मेरीटाईम बोर्डाचे प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन सूरज नाईक यांनी मालवण बंदर कार्यालयास भेट दिली. यावेळी त्यांनी किल्ला दर्शनास जाणारे तसेच अन्य पर्यटन बोटीवर पर्यटक लाईफ जॅकेट वापर करतात का? याची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत बंदर निरीक्षक आर. जे. पाटील, बाळासाहेब कदम आदी उपस्थित होते.

आकाश देशमुख आणि स्वप्नील पिसे अशी मृत पर्यटकांची नावे आहेत. आकाश हा अकोलामध्ये राहणारा रहिवाशी आहे, तर स्वप्निल हा पुण्याचा रहिवाशी आहे. तसेच रश्मी निशेल कासुल (४५) यांच्यावर रेडकर हॉस्पीलट येथे तर संतोष यशवंतराव (३८) यांच्यावर डॉ. अविनाश झांटये हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. मंगळवारी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास तारकर्ली (Tarkarli) समुद्रात स्कुबा डायव्हिग करुन परतत असताना बोट समुद्रा बुडाल्याची घटना घडली.


हेही वाचा – ‘येवा कोकण आपलोच नसा’; तारकर्ली दुर्घटनेनंतर साताऱ्याच्या वकील सुचित्रा घोगरे यांची फेसबुक पोस्ट व्हायरल