घरठाणेबनावट यूएलसी प्रमाणपत्र प्रकरणी नगररचनाकार दिलीप घेवारेला अटक

बनावट यूएलसी प्रमाणपत्र प्रकरणी नगररचनाकार दिलीप घेवारेला अटक

Subscribe

मीरा-भाईंदर शहरातील गाजलेल्या यूएलसी घोटाळ्यातील मुख्य आरोपी नगररचनाकार दिलीप घेवारेला ठाणे गुन्हे शाखेने सुरतमधून ताब्यात घेतलं आहे. दिलीप घेवारे गेल्या दोन आठवड्यांपासून फरार होता. गुरुवारी सकाळी गुजरातमधील सूरतमधून गुन्हे शाखेने कारवाई करत त्याला बेड्या ठोकल्या असून ठाण्याला त्याला परत घेऊन येत आहेत. या प्रकरणात आतापर्यंत तीन जणांना आधीच अटक केली आहे.

गेल्या दोन आठवड्यांपासून फरार असलेल्या दिलीप घेवारेने अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. आज त्याच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी सत्र न्यायालयात ठेवण्यात आली आहे. मात्र त्या आधीच गुन्हे शाखेने त्याला बेड्या ठोकल्या. दिलीप घेवारेवर नावट यूएलसी प्रमाणपत्र प्राप्त करून १०२ कोटी ८२ लाख रुपयांचे शासकीय महसुलाचे नुकसान केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची ठाणे गुन्हे शाखा चौकशी करत आहे. हे प्रकरण २०१६ मधील असून त्यावेळी पाच जणांना अटक करण्यात आली होती. नुकतीच मीरा भाईंदर महापालिकेचे निवृत्त साहाय्यक नगररचनाकार सत्यवान धनेगावे (५४), कनिष्ठ आरेखक भरत कांबळे (५६) आणि वास्तुविशारद मदतनीस शेखर लिमये (५५) यांना अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण?

बनावट यूएलसी प्रमाणपत्राचे प्रकरण २०१६ मध्ये समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. मीरा-भाईंदर शहराच्या विकास आरखड्यानुसार जमीन रहिवास क्षेत्रात असतानाही ती हरित क्षेत्रात दाखवून काही विकासकांनी यूएलसीच्या सवलतीसाठी बनावट प्रमाणपत्रे मिळविली होती. या बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे महापालिकेकडून परवानग्या घेऊन इमारतींचे बांधकाम करत शासनाची आर्थिक फसवणूक केली होती. २०१६ मध्ये ठाणेनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह इतर कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -