मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज कन्नड येथे शासन आपल्या दारी उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे, सहकारमंत्री अतुल सावे , कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित होते.
‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्रॅक्टर चालवले. त्यावेळी राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार त्यांच्या एकनाथ शिंदे चालवत असलेल्या ट्रॅक्टरमध्ये होते.
‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हार्वेस्टर चालवले. त्यावेळी राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार त्यांच्या एकनाथ शिंदे चालवत असलेल्या हार्वेस्टरमध्ये होते.
सरकार हे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय देणारे सरकार आहे.
राज्यात महायुती सरकार आल्यानंतर २८ जलसिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून त्याद्वारे ६ लाख हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्यात येणार आहे. सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानाला नैसर्गिक आपत्ती म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. आगामी काही दिवसात शेतकऱ्यांना नक्की नुकसान भरपाई देण्यात येईल असेही यावेळी बोलताना स्पष्ट केले. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना जोडधंदे करण्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात येणार असल्याचे यावेळी बोलताना स्पष्ट केले.
मराठवाड्यातील शेतकऱ्यांना जोडधंदे करण्यासाठी वाढीव निधी देण्यात येत आहे.
सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शासकीय कार्यालयात चकरा माराव्या लागू नये म्हणून राज्य सरकारने ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामुळे लाभार्थ्यांना एकाच छताखाली अनेक योजनांचा लाभ मिळत असल्याने हा उपक्रम राबविण्याचा निर्णय क्रांतिकारी ठरत आहे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शासन आपल्या दारी राज्याच्या विकासाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे पाठबळ आहे. कृषी क्षेत्रातील पायाभूत विकासासाठी २० हजार कोटी तर रेल्वे तसेच रस्ते विकासासाठी १३०० कोटी रुपये दिले आहेत. मराठवाड्यातील महत्वाकांक्षी वॉटर ग्रीड प्रकल्पासाठी केंद्राकडे निधीची मागणी करणार आहोत, आणि केंद्र सरकार नक्कीच भरीव निधी देईल, असा विश्वास मुख्यमंत्री यांनी व्यक्त केला.
सर्वसामान्यांचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे आणि समाजातील सर्वच घटकांचे हे सरकार असून त्यांच्या हिताचे अनेक निर्णय हे सरकार घेत आहे. केंद्राप्रमाणे राज्यामध्ये ‘नमो शेतकरी सन्मान योजना’ राबविण्यात येत असून केंद्राप्रमाणे राज्यानेही ६ हजार रुपयांची मदत दिलेली आहे. आकांक्षित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील १५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. एनडीआरएफच्या नियमात बदल करून ही मदत दुप्पटीने वाढवून आता तीन हेक्टर करण्यात आली आहे. गोगलगायींमुळे शेतीच्या नुकसानीची देखील आता भरपाई शासन देत आहे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शासकीय योजना सुलभपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ अभियान राज्यात राबविण्यात येत असून लाखो नागरिकांना त्याचा लाभ मिळतो आहे. आज जिल्ह्यातील १ लाख ४९ हजार ५७२ लाभार्थ्यांना ५ हजार ४५७ कोटी रुपयांच्या निधीचे वाटप होत आहे. शासनाने जलसिंचनाच्या २८ प्रलंबित योजनांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्यामुळे ६ लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. ‘नमो शेतकरी सन्मान योजना’ बळीराजाला लाभदायी ठरत आहे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे