कोकणकन्या एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड; कोकण रेल्वे दोन तासांपासून विस्कळीत

कोकण रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. कोकण रेल्वे मार्गवर धावणाऱ्या कोकण कन्या एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला आहे. रविवारी सकाळच्या सुमारास हा बिघाड झाला आहे.

कोकण रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. कोकण रेल्वे मार्गवर धावणाऱ्या कोकण कन्या एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला आहे. रविवारी सकाळच्या सुमारास हा बिघाड झाला आहे. त्यामुळं कोकण कन्या एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विलंबाच्या त्रासाचा सामना करावा लागणार आहे. मुंबईहून निघालेल्या कोकण कन्या एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून (सीएसएमटी) शनिवारी रात्री निघालेली कोकण कन्या गोव्यापासून जवळपास अडीचशे किलोमीटर अंतरावर बंद पडली.

इंजिनमध्ये नेमका काय बिघाड झाला आहे, हेही अजून स्पष्ट झालेलं नाही. ही सेवा किती वाजेपर्यंत दुरुस्त होईल, याविषयी अद्याप कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. रविवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास कोकण कन्या एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. त्यानंतर कोकण रेल्वेवर वाहतुकीचा खोळंबा झाला. परिणामी विलवडे रेल्वे स्थानकात कोकण कन्या एक्स्प्रेसमध्ये थांबली आहे. सकाळच्या वेळेस जवळपास दोन तासांपासून कोकण रेल्वेची सेवा कोलमडली आहे.

कोकण कन्या एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून शनिवारी रात्री 11 वाजून 5 मिनिटांनी सुटते. पहाटे 5:30 वाजताच्या सुमारास रत्नागिरी सोडल्यानंतर विलवडे रेल्वे स्थानकाच्या दिशेने कोकणकन्याचा प्रवास सुरु होते. मात्र त्याच वेळी गाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर विलवडे रेल्वे स्थानकातच कोकणकन्या दोन तासांपासून थांबून आहे.

मुंबईहून रात्री निघालेली कोकणकन्या एक्स्प्रेस गोव्यातील मडगांव रेल्वे स्थानकावर दुसऱ्या दिवशी सकाळी 10:45 वाजताच्या सुमारास पोहोचते. मात्र दोनपेक्षा अधिक तासांपासून रखडलेली ही गाडी आता कधी पोहोचणार, हे अद्याप अस्पष्ट आहे.


हेही वाचा – हिंदुत्वाचा बेसूर आणि भेसूर चेहरा पाहतोय–उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली