मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक 15 तासांपासून ठप्प, रत्नागिरीत टँकर उलटला

Lpg gas_tanker ratnagiri

मुंबई – 15 तासांपासून मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लांज्याजवळ अंजणारी पुलावरून एलपीजी टँकर उलटल्याने वाहतूक बंद ठेवण्यात आली आली आहे. अपघातग्रस्त टँकरमधील गँस सुरक्षित बाहेर काढल्यानंतर या मार्गावरची वाहतूक पूर्ववत होणार आहे. तोपर्यंत मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

गुरुवारी दुपारी 3 ते 4 च्या दरम्यान हा अपघात झाला. अपघातग्रस्त टँकर भारत पेट्रोलियम कंपनीचा असून तो मुंबई-गोवा महामार्गावरुन गोव्याच्या दिशेने प्रवास करत होता. रत्नागिरीतील लांज्याजवळ अंजणारी पुलावरून एलपीजी टँकर नदीपात्रात कोसळला. साधारणतः 24 ते 28 किलो एलपीजी या टँकरमध्ये असल्याची माहिती मिळत असून अपघातग्रस्त टँकरमधून काही प्रमाणात गॅल लिक होत असल्याचे समजते आहे.

टँकरमध्ये गॅस असल्यानं आसपासच्या रहिवासी नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान प्रशासनाकडून गोवा आणि उरणहून तज्ज्ञांची टीम घटनास्थळी दाखल होणार आहे. तज्ज्ञांच्या मदतीने या अपघातग्रस्त टँकरमधील एलपीजी काढून दुसऱ्या टँकरमध्ये ट्रान्सफर करण्यात येणार असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र, हे तज्ज्ञांचे पथक अद्यार घटनास्थळी दाखल झालेले नाही.

या मार्गाने वळवण्यात आली वाहतूक –

  • मुंबई-गोवा महामार्ग ठप्प असून या मार्गावरची वाहतूक पर्यायी मार्गावर वळवण्यात आली आहे. या मार्गावरील वाहतूक पुणस, काजगघाटी, रत्नागिरी अशी वळवण्यात आली आहे.
  • मुंबईच्या दिशेनं जाणारी वाहतूक शिपोली, पाली, दाभोळे या मार्गावरुन वळवण्यात आली आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवासासाठी पर्यायी मार्ग –

  • लांजा, शिपोली, पालीमार्गे रत्नागिरीकडे
  • देवधे, पुनस, काजरघाटीमार्गे रत्नागिरीकडे