ओवैसींना २०० रुपये दंड ठोठावलेल्या पोलिसाला ५ हजाराचे बक्षीस, आयुक्तांनी केलं कौतुक

traffic police get 200 fine for asaduddin owaisi due to without number plate car
ओवैसींना २०० रुपये दंड ठोठावलेल्या पोलिसाला ५ हजाराचे बक्षीस, आयुक्तांनी केलं कौतुक

एमआयएम पक्षप्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी पक्षाच्या कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. पक्षाच्या मेळाव्याला जाताना ओवैसींना पोलिसांच्या कारवाईला समोरे जावे लागले होते. पोलिसांनी त्यांच्याकडून २०० रुपयांचा दंड वसूल केला होता. कायद्यासमोर कोणीही मोठं नाही हे या घटनेमुळे सिद्ध झालं आहे. ज्या पोलिसाने ओवैसींकडून दंड वसूल केला होता त्या पोलिसाचे सोलापूर पोलीस आयुक्तांनी कौतुक केलं असून ५ हजार रुपयाचे बक्षीस दिले आहे.

एमआयएम पक्षाचा सोलापूरमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी उपस्थित होते. ओवैसींनी सोलापूरमध्ये आल्यावर एका महागड्या गाडीने प्रवास केला. हैदराबाद नाका ते सोलापूर शासकीय विश्रामगृहपर्यंतचा प्रवास ओवैसींनी विना नंबर प्लेटच्या गाडीने केला आहे. यामुळे वाहतूक शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ओवैसींच्या गाडीला २०० रुपयांचा दंड ठोठावला आणि तो वसुलही केला आहे. ज्या पोलीस अधिकाऱ्याने दंड ठोठावला त्यांचे पोलीस दलात कौतुक करण्यात येत आहे. सोलापूरच्या आयुक्तांनीही पोलीस अधिकाऱ्याचे कौतुक करत ५ हजार रुपये बक्षीस म्हणून दिले आहेत.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षाकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. एमआयएमच्या पक्षाकडून मेळावा आयोजित करण्यात आला होता. मंगळवारी या मेळाव्याला ओवैसी यांनी हजेरी लावली होती. हैदराबादवरुन ओवैसी सोलापूरमध्ये दाखल झाले होते. यावेळी त्यांनी एका लँड रोव्हर गाडीने प्रवास केला. या गाडीला नंबर प्लेट नव्हती. सोलापूर शासकीय विश्रामगृहात ओवैसी या गाडीने गेले. गाडीची नंबर प्लेट नव्हती त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करुन २०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.


हेही वाचा :  संजय पांडेच राहणार महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक; राज्य सरकार आंध्र प्रदेशचा फॉर्म्युला वापरणार