घरमहाराष्ट्रमद्यपान करणाऱ्यांनो सावधान!

मद्यपान करणाऱ्यांनो सावधान!

Subscribe

थर्टी फर्स्टच्या सेलेब्रिशनमध्ये तुम्ही मद्यपान प्राषण केले आणि त्यानंतर गाडी चालवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे.

सध्या थर्टी फर्स्ट सेलेब्रेशनचा फिवर लोकांमध्ये आहे. बऱ्याच लोकांना सुट्ट्या असल्यामुळे त्यांनी बाहेर फिरण्याचे प्लॅन केले आहेत. लोकांनी थर्टी फर्स्टच्या दिवशी कुठल्या ठिकाणी सेलिब्रेशन करायचे ते ठरवले आहे. परंतु, या सेलेब्रिशनमध्ये तुम्ही मद्यपान प्राषण केले आणि त्यानंतर तुम्ही गाडी चालवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. मद्यपान प्राषाण करुन गाडी चालवणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलीस यावर्षी कठोर कारवाई करणार आहेत.

पोलिसांची विशेष मोहिम

दरवर्षी मद्यपान प्राषाण करुन बरेच अपघात घडत असतात. या अपघातांवर आळा बसावा यासाठी पोलिसांकडून विशेष मोहिम राबवली जात आहे. ही मोहिम २५ डसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत राबवली जाणार आहे. पोलिसांकडून या सात दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात नकाबंदी करण्यात येत आहे. एका वाहतूक अधिकाऱ्याने सांगितले आहे की, जी व्यक्ती मद्यपान प्राषाण करुन गाडी चालवताना सापडेल त्या व्यक्तीच्या विरोधात कलम १८५ नुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या कायद्यान्वे संबंधित वाहन चालकाचा परवाना देखील रद्द होऊ शकतो. त्याचबरोबर वाहन चालकावर दंडात्म कारवाई देखील केली जाईल. त्यामुळे नागरिकांनी मद्यपान प्राषाण केल्यावर गाडी चालवू नये, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – सेलिब्रेशनच्या नावाखाली मद्यपान करताय…तर सावधान!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -