घरCORONA UPDATEअमृतांजन ब्रिजखाली आणखी एक लेन खुली; मुंबईच्या दिशेने वाहतूक सुरू

अमृतांजन ब्रिजखाली आणखी एक लेन खुली; मुंबईच्या दिशेने वाहतूक सुरू

Subscribe

मुंबई पुणे एक्सप्रेस वे दरम्यानचा अमृतांजन ब्रिज जमीनदोस्त केल्यानंतर अखेर तिसऱ्या लेनचे काम पुर्ण करण्यात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला यश आले आहे. मुंबईच्या दिशेने जाणारी तिसऱ्या लेनचे काम एमसएआरडीसीमार्फत पुर्ण करण्यात आले आहे. तर लवकरच पुण्याच्या दिशेचे कामदेखील पुर्ण करण्यात येणार आहे.

मुंबई पुणे एक्सप्रेस वे प्रवासादरम्यान वाहतुकीस अडथळा असणारा अमृतांजन ब्रिज हा ब्लास्टिंग करून उडवण्यात आला होता. त्यानंतर खालच्या बाजूला असलेले खांब काढून टाकण्यात आले. त्याठिकाणी उपलब्ध झालेल्या जागेत कॉंक्रिटीकरण करून तिसऱ्या लेनसाठी जागा तयार करण्यात आली आहे. त्यामुळे आता अमृतांजन ब्रिजच्या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी फुटण्यासाठी मदत होणार आहे. याठिकाणी चढण असल्याने मालवाहू वाहनांमुळे वाहतूक कोंडी होण्याचा अनुभव एरव्ही वाहनचालकांना नेहमीच येत असतो. पण आता तिसऱ्या लेनमुळे प्रवाशांसाठी ही सुविधा उपलब्ध होईल. त्यामुळे एरव्ही होणारी वाहतूक कोंडी याठिकाणी कमी होईल असा एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांना विश्वास वाटतो.

- Advertisement -

कोकणाला महाराष्ट्राशी जोडणारा १९० वर्षे जुना अमृतांजन ब्रिज एन लॉकडाऊनच्या स्थितीत ५ एप्रिल रोजी तब्बल ९ तासांच्या मेहनतीनंतर जमीनदोस्त करण्यात आला. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या टीमने घेतलेल्या अथक मेहनतीमुळे अतिशय आव्हानाचा असलेला ब्रिज आज कंट्रोल ब्लास्टिंग पद्धतीने जमीनदोस्त करण्यात आला. या कामामुळे या भागात अपघाताचे प्रमाण कमी होतानाच, वाहतुक कोंडी फुटण्यास मदत होणार आहे. येत्या काही दिवसात मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या अतिरिक्त लेनचे काम पुर्ण करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -