Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र बिबट्याच्या अवयवांची तस्करी; मात्र, पोलिसांना मिळाली 'टीप' अन्...

बिबट्याच्या अवयवांची तस्करी; मात्र, पोलिसांना मिळाली ‘टीप’ अन्…

Subscribe

संगमनेर : तालुक्यातील हिवरगाव पावसा टोल नाक्या जवळ बिबट्याचे दात, सुळे, नखे, आणि मिशा यांची विक्री होणार असल्याची माहिती संगमनेर वनविभागाला समजली. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाने या परिसरात सापळा लावला, चंदनापुरीच्या आनंदवाडी येथील रहिवासी श्रीराम यादव सरोदे( वय ३४), सुधीर विजय भालेराव( वय ३०) या दोघा तस्करांना वनविभागाने पकडले असून त्यांच्याकडून बिबट्याची नखे, दात आणि इतर अवयव जप्त केले आहेत.तर तिसरा आरोपी सुशांत उत्तम भालेराव राहणार आनंदवाडी हा पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.

याबाबत वनविभागाकडून मिळालेली माहिती अशी की, बिबट्याच्या अवयवांची तस्करी झाल्याने संगमनेर तालुक्यासह वन विभागात मोठी खळबळ उडाली आहे. या दोघानांही अटक करण्यात आली आहे हे तिघे एका मोटरसायकलवरून बिबट्याचे अवयव विकणार असल्याची माहिती वन विभागाला समजली होती त्यानंतर वनविभागाने या परिसरात सापळा लावत या तस्करांच्या मुस्क्या आवलल्या आहेत.

- Advertisement -

उप विभागीय वनाधिकारी संदीप पाटील, जुन्नरचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते योगेश वरखड यांच्या मार्गदर्शनाखाली रईस मोमीन ,संदीप येवले ,कुणाल घुले ,तन्मय बागल ,हरून सय्यद ,विक्रांत बुरांडे, अरुण देशमुख ,गजानन पवार,वनपाल चैतन्य कासार, एस एम पारधी, जी बी पवार, या वनाधिकार्‍यांनी हा सापळा लावत बिबट्याच्या अवयवांची तस्करी करणार्‍यांना गजाआड केले आहे यातील तिसर्‍या आरोपीचा वनविभागाचे अधिकारी शोध घेत आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -