घरमहाराष्ट्रTrain Accident: मालगाडीचे डबे रुळावरून घसरले; इगतपुरीजवळील घटना, रेल्वे वाहतुकीवर परिणाम

Train Accident: मालगाडीचे डबे रुळावरून घसरले; इगतपुरीजवळील घटना, रेल्वे वाहतुकीवर परिणाम

Subscribe

मिळालेल्या माहितीनुसार, कसारा रेल्वे स्थानकातून इगतपुरीच्या दिशेने जाणारी मालगाडीचे सात डबे रेल्वे रुळावरून घसले. त्यामुळे नाशिक आणि कल्याण मार्गांवरील वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली आहे.

मुंबई : मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या कासारा-इगतपुरी घाटात मालगाडीचे 7 डबे रुळावरून घसरल्याची घटना रविवारी (10 डिसेंबर) रोजी रात्री घडली. यामुळे नाशिक दिशेने जाणारी वाहतूक रखडली असून, अनेक एक्स्प्रेस गाड्यांना ब्रेक लागला आहे. यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोर जावे लागत आहे. (Train Accident Goods train derailed Incident near Igpuri impact on rail traffic)

मिळालेल्या माहितीनुसार, कसारा रेल्वे स्थानकातून इगतपुरीच्या दिशेने जाणारी मालगाडीचे सात डबे रेल्वे रुळावरून घसले. त्यामुळे नाशिक आणि कल्याण मार्गांवरील वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली आहे. तर मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीवर याचा परिणाम झालेला नसून, लोकल वाहतुकीवर देखील याचा परिणाम झाला नसल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.

- Advertisement -

रेल्वे रुळावरून डबे बाजुला करण्याचे काम सुरू

रविवारी संध्या 7 ते साडेसात वाजताच्या सुमारास कसारा- इगतपुरी घाटात हा अपघात झाला असून, नाशिक दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे रखडली आहे. रेल्वे रुळावरुन मालगाडीचे डबे बाजूला करण्याचे काम सुरू आहे. पण यामुळे अनेक गाड्या उशीरा धावत आहेत. असे जरी असले तरी रेल्वे रुळावरून डबे बाजुला करण्यासाठी तब्बल पाच ते सात किंवा सोमवार सकाळपर्यंतचाही वेळ लागू शकतो अशी माहितीही मध्य रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हेही वाचा : Winter Session : शेतकरी, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर वादळी चर्चा? अधिवेशनाचा दुसरा आठवडा गाजणार

- Advertisement -

एक्सीडेंट रिलीफ ट्रेन घटनास्थळी

घटनेची माहिती मिळताच रेल्वे विभाग खळबळ जागा झाला असून, रुळावरून डबे बाजुला करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी कल्याण येथून एक्सीडेंट रिलीफ ट्रेन पाठवण्यात आली आहे. तोपर्यंत मुंबईवरून नाशिक दिशेने विविध ठिकाणी जाणाऱ्या गाड्या थांबविण्यात आल्या आहेत. तर काही रेल्वे दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आल्या आहेत.

हेही वाचा :  Sanjay Raut : संजय राऊत यांच्या गाडीवर चप्पलफेक; सोलापुरातील घटनेने खळबळ

विदर्भ, मराठवाड्याकडे जाणाऱ्या ट्रेन थांबल्या

नियमीत वेळेवर धावणाऱ्या सीएसएमटी हावडा आणि सीएसएमटी आदिलाबाद, नंदीग्राम एक्सप्रेस या गाड्यांना अपघातामुळे फटका बसला आहे. विशेष म्हणजे या ट्रेन विदर्भ, मराठवाड्याकडे जाणाऱ्या असून, घडलेल्या या अपघातामुळे त्यांना ब्रेक लागला आहे. तर मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीवर याचा परिणाम झालेला नसून, लोकलही सुसाट धावत आहेत. मात्र, विदर्भ,मराठवाड्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना आजची रात्र रेल्वेतच काढावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -