Homeमहाराष्ट्रTrain Accidents : गेल्या 10 वर्षात गेले अफवांचे एवढे रेल्वे बळी, वाचा...

Train Accidents : गेल्या 10 वर्षात गेले अफवांचे एवढे रेल्वे बळी, वाचा सविस्तर

Subscribe

मुंबई : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे काही प्रवाशांना बंगळूरू एक्स्प्रेसने चिरडले. या घटनेमध्ये तब्बल 13 जणांना आपले प्राण गमवावे लागले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिल्यानुसार एका अफवेमुळे हा सर्व प्रकार घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अफवांमुळे झालेल्या रेल्वे अपघाताची आठवण सर्वांनाच झाली. काही वर्षांपूर्वी मुंबईतील एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर चेंगराचेंगरी झाली होती. यामध्ये तब्बल 29 जणांना प्राण गमवावे लागले होते. यावेळी हा सर्व प्रकार अफवांमुळे झाल्याचे समोर आले होते. (Train Accidents after fake news incidents in last 10 years mumbai elphinstone parel bridge)

हेही वाचा : SS UBT Vs BJP : भाजपच्या शहा – फडणवीसी राजकारण्यांनी महाराष्ट्र गलितगात्र केला, ठाकरे संतापले

असा झाला होता मुंबईतील अपघात

29 सप्टेंबर 2017ला मुंबईमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. यावेळी मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी मुंबई लोकल उशिराने धावत होत्या. अशामध्ये सकाळी वेळ असल्यामुळे कामाला जाणाऱ्या लोकांची लगबग होती. यावेळी मुंबईतील परेल आणि एलफिन्स्टन रेल्वे स्थानकांना जोडणाऱ्या पुलावर प्रचंड गर्दी झाली होती. अशावेळी काही जणांनी पूल शाबूत असतानाही पुलाचा काही भाग कोसळल्याची अफवा पसरवली. तर काही जणांनी शॉर्ट सर्किट झाल्याची अफवा पसरवली. पण या अफवांमुळे पुलावर असलेल्या लोकांचा मोठा गोंधळ उडाला आणि प्रत्येकजण आपला जीव वाचवण्यासाठी पुलाबाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागला.

यावेळी या गर्दीत अनेक महिला, लहान मुले तसेच पुरुष होते. अफवा पसरताच स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धावपळ करू लागले. अशामध्ये पूल अरुंद असल्याने अनेकजण या पुलावरच अडकून पडले. काहींनी तर पुलावरून उड्या मारल्या. या चेंगराचेंगरीत अनेकजण पायदळी तुडवले गेले. या घटनेत तब्बल 29 जणांचा मृत्यू झाला होता. तर, अनेकजण यामध्ये जखमी झाले होते. फक्त काही अफवांमुळे या नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. तसेच, 22 जानेवारीला झालेल्या जळगावमधील अपघातात 13 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, “एका चहा विक्रेत्याने रेल्वेमधील एका डब्यात आग लागल्याची आरडाओरड केली. त्यामुळे प्रवाशांनी घाबरून खाली उड्या मारल्या. पण, ही घटना फक्त आणि फक्त अफवांमुळे घडली,” अशी माहिती त्यांनी दिली. त्यामुळे पुन्हा एकदा अफवांमुळे लोकांचे नाहक बळी गेले.