घरताज्या घडामोडीमध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

Subscribe

मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास मध्य रेल्वेच्या आंबिवली आणि टिटवाळा रेल्वे स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे लोकल वाहतूक तब्बल २० ते २५ मिनिटे उशीराने धावत आहे.

मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास मध्य रेल्वेच्या आंबिवली आणि टिटवाळा रेल्वे स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे लोकल वाहतूक तब्बल २० ते २५ मिनिटे उशीराने धावत आहे. (Central Railway Trains are running late due to signal problem between Titwala and Ambivli stations)

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या कसरा मार्गावरील आंबिवली आणि टिटवाळा रेल्वे स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. त्यामुळे वाहतूक तब्बल २० ते २५ मिनिटे उशीराने धावत आहे. परिणामी कसाराहून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.

- Advertisement -

बुधवारी सकाळी ऐन कामाच्यावेळी लोकल वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला. लोकल वाहतूक उशीराने सुरू असल्याने रेल्वे स्थानकातही प्रवाशांची मोठी गर्दी जमली आहे. प्रवाशांना धक्काबुक्कीचा त्रास सहन करत प्रवास करावा लागतो आहे.

सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याची माहिती मिळताच रेल्वेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या रेल्वेचे कर्मचारी तांत्रिक बिघाड दुरूस्त करत आहेत.

- Advertisement -

दरम्यान, मध्य रेल्वेच्या कसारा-इगतपूरी रेल्वे मार्गिकेवर मंगळवार रात्री इंजिनची तीन चाकं रुळांवरून घसरली. या घटनेमुळे मुंबईहून कसाऱ्याच्या दिशेने वाहतूक करणारी आणि कसाऱ्याहून कल्याण, ठाणे आणि मुंबईच्या दिशेने वाहतूक करणारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे ठाणे, कल्याण आणि मुंबईतील रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. ऐन गर्दीच्या वेळेत हा प्रकार घडल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात होता.

मध्य रेल्वेच्या कसारा- इगतपूरी मार्गावर घाटातून लांबपल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक करण्यासाठी जोड इंजिन वापरले जाते. मंगळवारी रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास हे इंजिन कसाऱ्याहून इगतपूरीच्या दिशेने जात होते. इंजिन कसाऱ्याजवळील रेल्वे उड्डाणपूलाजवळ आले असता इंजिनची तीन चाके रुळांवरून घसरली.


हेही वाचा – काश्मिरी पंडित हा राष्ट्रीय चिंतेचा विषय, ठाकरे गटाकडून मोदी सरकारवर शरसंधान

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -