घरताज्या घडामोडीआर्थिक गुन्हे शाखेत मोठी खांदेपालट, १३ अधिकाऱ्यांच्या बदल्या

आर्थिक गुन्हे शाखेत मोठी खांदेपालट, १३ अधिकाऱ्यांच्या बदल्या

Subscribe

आर्थिक गुंन्हे शाखेत अधिकाऱ्याच्या बदल्या

सचिन वाझे प्रकरणामुळे मुंबई पोलीस दलात आतापर्यंत मोठ्या प्रमाणात बदली करण्यात आली आहे. मागील महिन्यात गुन्हे शाखेत ६५ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या यानंतर काही अधिकाऱ्यांच्याही बदल्या केल्या. आर्थिक गुन्हे शाखेत (ईओडब्ल्यू) मध्ये पाच वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मुंबई आर्थिक गुन्हे शाखेमधील १३ अधिकाऱ्यांच्या अन्यत्र बदली करण्यात आली आहे. ज्या कर्मचाऱ्यांचा आणि अधिकाऱ्यांचा चार वर्षांचा कालावधी पूर्ण झाला असेल त्यांची बदली करण्यात येणार आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना यापुढे नवीन तपास न देण्याचे निर्देश काढण्यात आले आहे.

आर्थिक गुन्हे शाखेत असलेल्या १३ अधिकाऱ्यांची इतरत्र बदली करण्यात आली आहे. यामध्ये पोलीस निरीक्षक दिलीप.ग.देशमुख यांची विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस सह आयुक्त, आर्थिक गुन्हे अधिकाऱ्यांना बदली झालेल्या ठिकाणी हजर होण्यासाठी तात्काळ कार्यमुक्त केले आहे. आर्थिक गुन्हे शाखेतील ४५ टक्के अधिकाऱ्यांची बदली करण्याची शक्यता आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पदभार स्विकारल्यानंतर मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

- Advertisement -

आर्थिक गुन्हे शाखेत साडेसहा कोटीपेक्षा अधिक रकमेचे गुन्हे, फसवणूक, आर्थिक गैरव्यवहार अशा प्रकरणाचा तपास करणारे अनेक अधिकारी चार वर्षांपासून काम करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेत तीन वर्षांपर्यत अधिकारी कार्यरत असतात यानंतर त्यांची बदली करण्यात येते. परंतु अद्यापही काही अधिकारी कार्यरत आहेत. या सर्व अधिकाऱ्यांची आता इतर ठिकाणी बदली करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -