घरमहाराष्ट्रचार आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; आशिषकुमार सिंह यांची वित्त विभागात नियुक्ती

चार आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; आशिषकुमार सिंह यांची वित्त विभागात नियुक्ती

Subscribe

वित्त विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला यांची ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवपदी तर ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांची महाराष्ट्र राज्य विद्युत महापारेषण कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली आहे

मुंबई : राज्य सरकारने गुरुवारी मंत्रालयातील चार ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहे. त्यानुसार परिवहन आणि बंदरे विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह यांची वित्त विभागात (लेखा आणि कोषागरे) बदली करण्यात आली आहे.

वित्त विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला यांची ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवपदी तर ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांची महाराष्ट्र राज्य विद्युत महापारेषण कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली आहे. वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव पराग जैन यांची परिवहन आणि बंदरे विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान विभागाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. पराग जैन यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या वस्त्रोद्योग विभागाचा अतिरिक्त कार्यभार उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

- Advertisement -

1988च्या बॅचचे आयएएस अधिकारी आशिष कुमार सिंग यांची वित्त विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी (लेखा आणि कोषागार) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 1993च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आभा शुक्ला यांची उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाच्या प्रधान सचिवपदी (ऊर्जा) नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच 1994 च्या बॅचचे आयएएस अदिकारी दिनेश वाघमारे यांची विद्युत पारेषण कंपनीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. 1996 च्या बॅचचे पराग जैन नैन्युतिया यांची गृह विभागाचे प्रधान सचिव म्हणून मंत्रालयात नियुक्ती करण्यात आली आहे.

1. आशिष कुमार सिंग, IAS (MH:1988), अतिरिक्त मुख्य सचिव (परिवहन आणि बंदरे), गृह विभाग, मंत्रालय, यांची अतिरिक्त मुख्य सचिव (लेखा आणि कोषागार), वित्त विभाग, मंत्रालय म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
2. आभा शुक्ला, IAS (MH:1993), प्रधान सचिव (लेखा आणि कोषागार), वित्त विभाग, मंत्रालय यांना प्रधान सचिव (ऊर्जा), उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभाग, मंत्रालय म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
3. दिनेश टी.वाघमारे, IAS (MH:1994), प्रधान सचिव (ऊर्जा), उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभाग, मंत्रालय यांना अध्यक्ष आणि M.D., M.S. विद्युत पारेषण कंपनी लि., मुंबई.
4. परराग जैन नैनुतिया, IAS (MH:1996), प्रधान सचिव (वस्त्र), सह-ऑप., विपणन आणि वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय यांची प्रधान सचिव (परिवहन आणि बंदरे), गृह विभाग, मंत्रालय म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आणि प्रधान सचिव (I.T.), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय यांचा अतिरिक्त कार्यभार.

- Advertisement -

हेही वाचाः भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी चित्रा वाघ यांची नियुक्ती

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -