राज्य सरकारकडून मुंबईतील दोन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे सत्र सुरू आहे. गेल्या आठवड्यात देखील पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आज पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारने मुंबईतील दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी अमगोथू श्री रंगा नाईक आणि जीएसटी विभागाचे सहायक आयुक्त अनिल भंडारी यांची बदली करण्यात आली आहे.

अमगोथू श्री रंगा नाईक यांची मुंबई जीएसटी विभागाचे सहायक आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. तर अनिल भंडारी यांची एमआयडीसीचे सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


हेही वाचा : शिंदे सरकारकडून राज्यातील 44 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या