घर महाराष्ट्र बदल्यांचे सत्र कायम : राममूर्ती एमएमआरडीएचे सहआयुक्त

बदल्यांचे सत्र कायम : राममूर्ती एमएमआरडीएचे सहआयुक्त

Subscribe

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने बदल्यांचा धडाका कायम ठेवला आहे. आजही शासनातर्फे सहा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मुंबई आणि परिसरातील मेट्रो तसेच इतर महत्त्वाचे प्रकल्प ध्यानी घेऊन एमएमआरडीएच्या सहआयुक्तपदी एम. राममूर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चारच दिवसांपूर्वी मुंबईतील पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले होते. त्यात 28 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.

नागपूर येथील वस्त्रोद्योग संचालक शीतल उगले-तेली यांची सोलापूर महापालिका आयुक्त म्हणून तर, सोलापूर महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांची नागपूरचे वस्त्रोद्योग संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एस. राममूर्ती यांच्याकडे एमएमआरडीएच्या सहआयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

- Advertisement -

नागपूर जिल्हा परिषदेचे सीईओ योगेश कुंभेजकर यांची भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी म्हणून तर, बुलडाणा जिल्हा परिषदेच्या सीईओ भाग्यश्री विसपुते यांना नागपूर जिल्हा परिषदेच्या सीईओपदी नियुक्ती देण्यात आली आहे. याशिवाय, एस. एम. कुर्तकोटी यांची बुलडाणा जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
अलीकडेच पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्त स्तरावरील 28 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी काढले होते. यापैकी काही अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते.

- Advertisement -

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे पदावरून पायउतार झाल्यानंतर त्यांच्या विरोधात मुंबई आणि ठाण्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात खंडणीचे गुन्हे दाखल झाले होते. त्या गुन्ह्यांमध्ये पोलीस उपायुक्त पराग मणेरे, अकबर पठाण आणि दीपक देवराज या अधिकाऱ्यांची देखील नावे होती. अकबर पठाण यांची बदली नाशिकमधून मुंबई परिमंडळ 3 या ठिकाणी करण्यात आली.

- Advertisment -