घरमहाराष्ट्रराज्याच्या अतिवरीष्ठ पोलीस खात्यात मोठी खांदेपालट!

राज्याच्या अतिवरीष्ठ पोलीस खात्यात मोठी खांदेपालट!

Subscribe

राज्यातल्या महासंचालक दर्जाच्या एकूण ११ वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून यामध्ये ठाणे, नवी मुंबई, पुणे, नागपूरच्या अधिकाऱ्यांत मोठी खांदेपालट करण्यात आली आहे.

राज्यातल्या महासंचालक दर्जाच्या एकूण ११ वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून पोलीस खात्यात मोठा खांदेपालट करण्यात आला आहे. ठाण्याचे आयुक्त परमबीर सिंग यांची पोलीस मुख्यालयात कायदा व सुव्यवस्था विभागात बदली झाली असून त्यांच्या जागी एसीबीचे प्रमुख विवेक फणसळगीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळीच विवेक फणसळगीकर यांनी ठाण्याचे नवे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. नवी मुंबईचे आयुक्त हेमंत नागराळे यांची पोलीस मुख्यालयात बदली आलेली आहे तर त्यांच्या जागी सीआयडीचे प्रमुख संजय कुमार यांची वर्णी लागलेली आहे. तर संजय कुमार यांच्या रिक्त जागी गृह विभागाचे प्रधान सचिव रजनीश सेठ यांची नियुक्ती झाली आहे. तर सेठ यांच्या जागेवर वैधमापन शास्त्र विभागाचे नियंत्रक अमिताभ गुप्ता यांची निवड झालेली आहे.

ठाणे, नवी मुबई, पुणे यासह महाराष्ट्रातल्या बड्या अधिकाऱ्यांची बदली झाल्यामुळे पोलीस खात्यात मोठे बदल झाले आहेत. पुण्याच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांची राज्य पोलीस वाहतूक महामार्ग प्रमुखपदी निवड झाली असून त्यांची धुरा नागपूरचे आयुक्त डॉ. व्यंकटेशम यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तपदी राज्य वाहतूक महामार्गचे महासंचालक आर.के. पद्मनाभन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या सव्वातीन वर्षांपासून ठाण्याचे आयुक्त म्हणुन कार्यरत असणारे परमबीर सिंग यांना अपेक्षेप्रमाणे पोलीस महासंचालक कार्यालयाचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे प्रमुखपद देण्यात आले आहे. गेल्या आठ महिन्यांपासुन कायदा व सुव्यवस्थेचे पद हे अतिरीक्त कार्यभार म्हणुन बिपीन बिहारी यांच्याकडे सोपवण्यात आले होते ते आता परमबीर सिंग यांच्याकडे देण्यात आले आहे.

- Advertisement -

नागपुरचे डॉ. व्यंकटेशम यांच्यावर पुण्याच्या आयुक्तपदाची धुरा सोपवल्यामुळे त्याच्या नागपुरच्या जागी कारागृहाचे महानिरीक्षक भुषणकुमार उपाध्याय यांची वर्णी लागलेली आहे. सीआयडीचे प्रमुख संजय कुमार यांची नवी मुंबईच्या आयुक्तपदी निवड झाल्याने सीआयडीच्या प्रमुखपदावर गुन्हे अभिलेख विभागाचे अप्पर महासंचालक संजीव सिंघल यांची वर्णी लागलेली आहे. नवी मुंबईच्या आयुक्तपदावर असणारे हेमंत नागराळे यांना पोलीस मुख्यालय कार्यालयात सामग्री व तरतुद विभागाच्या अप्पर महासंचालकपदी निवड झाली आहे.

बदल्यांना मराठा आंदोलन जबाबदार?

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरून आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन हिंसक बनल्याने पोलीस खात्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली होती. मुंबई, ठाणे, नवी मुंबई या ठिकाणी झालेल्या हिंसक आंदोलनादरम्यान अनेक तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. या आंदोलनामुळे राज्यात असंतोष पसरला होता. त्यामुळे लगेचच ह्या बदल्या झाल्यामुळे मराठा आंदोलनामुळेच कदाचित वरीष्ठ अधिकाऱ्यांना याची झळ बसली असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -