घरमहाराष्ट्रराज्य पोलीस दलातील 25 पोलीस अधीक्षक-उपायुक्तांच्या बदल्या

राज्य पोलीस दलातील 25 पोलीस अधीक्षक-उपायुक्तांच्या बदल्या

Subscribe

श्रीकांत धिवरे यांची पुण्याच्या लोहमार्ग, पोलीस अधीक्षक तर उज्ज्वला वनकर यांची जालना येथील राज्य राखीव पोलीस बलाच्या समादेशक म्हणून बदली करण्यात आली आहे

मुंबई – राज्य पोलीस दलातील 25 पोलीस उपायुक्त, पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांच्या मंगळवारी अंतर्गत करण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून या बदल्या अपेक्षित होत्या. अखेर मंगळवारी बदल्याचे आदेश जारी करण्यात आले. त्यात श्रीकांत धिवरे यांची पुण्याच्या लोहमार्ग, पोलीस अधीक्षक तर उज्ज्वला वनकर यांची जालना येथील राज्य राखीव पोलीस बलाच्या समादेशक म्हणून बदली करण्यात आली आहे.

इतर 23 पोलीस उपायुक्त आणि पोलीस अधीक्षकांमध्ये अर्चना पाटील यांची हिंगोलीच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक, रत्नाकर नवले यांची मुंबईच्या युसीटीसी, फोर्स वनच्या अप्पर पोलीस अधीक्षक, सागर कवडे यांची वर्धा येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक, अशोक वीरकर यांची मुंबईच्या एटीएस पोलीस अधीक्षक, प्रशांत होळकर यांची मुंबईच्या राज्य मानवी हक्क आयोगच्या पोलीस अधीक्षक, प्रसाद अक्कानूर यांची मरोळ पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य, डी. के पाटील-भुजबळ यांची नागपूरच्या नक्षलविरोधी अभियान, पोलीस अधीक्षक, अरविंद साळवे यांची महामार्ग सुरक्षा विभागाच्या पोलीस अधीक्षक, पी. पी. शेवाळे यांची महा राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कार्यकारी संचालक, प्रशांत मोहिते यांची नवी मुंबई पोलीस उपायुक्त, निलेश अष्टेकर यांची पुण्याच्या राज्य गुप्तवार्ता विभागाच्या उपायुक्त, विजयकांत सागर यांची नागपूर शहर पोलीस उपायुक्त, प्रशांत वाघुंडे यांची नवी मुंबईच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisement -

विशाल गायकवाड यांची नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमी पोलीस अधीक्षक, अजित बोर्‍हाडे यांची सोलापूरच्या पोलीस उपायुक्त, दत्ता कांबळे यांची अकोलाच्या पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य, ज्योती क्षीरसागर यांची नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या पोलीस अधिक्षक, योगेश चव्हाण आणि निलेश मोरे यांची मुंबईच्या राज्य गुप्तवार्ता विभागाच्या उपायुक्त, विजय पवार यांची धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य, संदीप जाधव यांची ठाण्याच्या नागरी हक्क संरक्षणाच्या पोलीस अधीक्षक, वैशाली ईश्वर कडुकर यांची सोलापूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य, विक्रम साळी यांची नाशिकच्या नागरी हक्क संरक्षण विभागाच्या पोलीस अधीक्षक यांचा समावेश आहे.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -