राज्यातील 3 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; डॉ. विजय सूर्यवंशी MMRDAचे अतिरिक्त आयुक्त

राज्यातील आयएएस (IAS Officer) अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत आहेत. नुकताच 3 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार, विजयालक्ष्मी प्रसन्ना-बिदरी, IAS (MH:2001) यांची विभागीय आयुक्त, नागपूर विभाग, नागपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई : राज्यातील आयएएस (IAS Officer) अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी 3 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्यानुसार 2001 बॅचच्या आयएएस अधिकारी विजयालक्ष्मी प्रसन्ना-बिदरी यांची विभागीय आयुक्त, नागपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विजयालक्ष्मी प्रसन्ना-बिदरी यांच्यासह आणखी दोन जणांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. (Transfers of 3 IAS officers in the state Dr Suryavanshi appointed as Commissioner of MMRDA)

2006 बॅचच्या आयएएस अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांची MMRDAच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच 2011 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांना उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ, मुंबईचे सदस्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याने अनेकांच्या विभागाचा कारभार बदलला जाणार आहे. तसेच नवे अधिकारी आल्याने आता कार्यपद्धतीतही बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शुक्रवारी या बदल्यांबाबत मोठी घोषणा करण्यात आलीय.

आयएएस अधिकारी विजयालक्ष्मी प्रसन्ना-बिदरी

विजयालक्ष्मी प्रसन्ना बिदरी यांनी सहाय्यक आयुक्त, गुवाहाटी (आसाम) म्हणून काम केले आहे. त्यानंतर सहाय्यक आयुक्त, हिंगोली (महाराष्ट्र), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सिंधुदुर्ग), जिल्हाधिकारी (सिंधुदुर्ग), महाराष्ट्र राज्य महिला आयोग सदस्य सचिव, महाराष्ट्र महिला विकास महामंडळ व्यवस्थापकीय संचालक, संचालक IT, IT विभाग, महाराष्ट्र सरकार म्हणूनही काम पाहिलंय. तसेच त्या काही काळ सिंधुदुर्गाच्या जिल्हाधिकारीसुद्धा होत्या. त्यानंतर विजयालक्ष्मी प्रसन्ना-बिदरी यांची कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता विजयालक्ष्मी प्रसन्ना-बिदरी यांची नागपूर विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

आयएएस अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्तपदाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर बदली झालेले मात्र नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले डॉ. विजय सूर्यवंशी यांची मुंबई महानगरप्रदेश विकास प्राधिकरणात (एमएमआरडीए) अतिरिक्त महानगर आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी त्यांच्या बदलीचा आदेश काढला.

आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर

2011 च्या बॅचचे असलेले सुशील खोडवेकर यांना उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ, मुंबईचे सदस्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. हे एक साईड पोस्टिंग मानले जाते. प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी निलंबित केलेले आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांना महाराष्ट्र सरकारने पुन्हा सेवेत घेतले आहे. 29 जानेवारी रोजी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारने सुशील खोडवेकर यांची नियुक्ती केली आहे.


हेही वाचा – मुंबईतील वाडिया रुग्णालयात भीषण आग, अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल