घरमहाराष्ट्रराज्यातील ६ आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या

राज्यातील ६ आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या

Subscribe

राजेश पाटील यांची संचालक, सैनिक कल्याण, पुणे यांची सहव्यवस्थापकीय संचालक पदावरून सिडको, नवी मुंबई अतिरिक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे

मुंबई : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पार पडताच सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारकडून शुक्रवारी रात्री 6 आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर अधिकार्‍यांच्या बदल्यांची प्रक्रियाही वेगाने सुरू आहे. काही दिवसांपूर्वी ३० वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्यानंतर आता ६ आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये राजेश पाटील आणि अजय गुल्हाने यांच्यासह इतर ४ अधिकार्‍यांचा समावेश आहे.

राजेश पाटील यांची संचालक, सैनिक कल्याण, पुणे यांची सहव्यवस्थापकीय संचालक पदावरून सिडको, नवी मुंबई अतिरिक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर अश्विन ए. मुद्गल यांची सह व्यवस्थापकीय संचालक, सिडको, नवी मुंबई एमएमआरडीएमध्ये अतिरिक्त आयुक्त पदावर बदली करण्यात आली आहे. तर अजय अण्णासाहेब गुल्हाने यांची नागपूर स्मार्ट सिटी, सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisement -

नागपूर आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, नागपूर महानगरपालिका, नागपूर यांचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे देण्यात आला आहे. तसेच दीपक सिंगला यांची अतिरिक्त आयुक्त, पीएमआरडीए पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाग्यश्री बानायत यांची नाशिक महानगरपालिका, नाशिक येथे अतिरिक्त महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर डॉ. इंदुरानी जाखर यांची एमएव्हीआयएम मुंबईच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -