घरमहाराष्ट्रराज्यातील उपायुक्त-सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या

राज्यातील उपायुक्त-सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या

Subscribe

राज्यातील पोलीस उपायुक्त- पोलीस अधिक्षक सहाय्यक पोलीस आयुक्त-पोलीस उपअधिक्षकांच्या मंगळवारी बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहे. त्यात एकोणावीस पोलीस अधिकार्‍यांचा समावेश आहे.

राज्यातील पोलीस उपायुक्त- पोलीस अधीक्षक सहाय्यक पोलीस आयुक्त-पोलीस उपअधिक्षकांच्या मंगळवारी बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहे. त्यात एकोणावीस पोलीस अधिकार्‍यांचा समावेश आहे. ( Transfers of Deputy Commissioners Assistant Commissioners of Police in the State )

सिंधुदुर्गचे पोलीस अधिक्षक तानाजी वांदे यांची कोल्हापूर शहर, पिंपरी-चिंचवडचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांची खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्र, निलंगाचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे यांची सिल्लोड, शिर्ंडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांची अहमदनगर, जालनाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांची मंगळवेढा, बदलीच्या प्रतिक्षेत असलेले संदीप मिटके यांची शिर्डी, अश्‍विनी शेंडगे यांची दहिवडी, अकलुजचे उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे यांची श्रीरामपूर, छत्रपती संभाजीनगरचे अप्पर-उपायुक्त नितिन कटेकर यांची निलंगा, मंगळवेढाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांची पुणे गुन्हे अन्वेषण विभाग, जयसिंगपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्‍वर वेंजणे यांची पांढरकवडा, रत्नागिरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांची अक्कलकुवा, नागपूर पोलीस शिक्षण केंद्राच्या उपप्राचार्य शोभा पिसे यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वीच उपायुक्तांच्या झाल्या होत्या बदल्या

मुंबई पोलीस दलामधील 09 पोलीस उपायुक्तांच्या बुधवारी, (ता. 24 मे) खात्यांतर्गत बदल्या करण्यात आल्या. काही दिवसांपूर्वी बदली होऊन आलेल्या अधिकाऱ्यांच्या पुन्हा बदल्या करण्यात आलेल्या आहेत. गेल्या महिन्याभरात अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. तर काही अधिकाऱ्यांच्या पदोन्नती करत त्यांना बढती देखील देण्यात आलेली आहे. पण आता पुन्हा एकदा मुंबईतील 09 अधिकाऱ्यांच्या खात्यांतर्गत बदल्या करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत या अधिकाऱ्यांना बदल्या करण्यात आल्याचे प्रमाणपत्राच्या प्रती देण्यात येणार आहेत.

( हेही वाचा: Wrestlers Protest: कुस्तीपटूंच्या आंदोलनात सचिन तेंडूलकरची एंट्री; राष्ट्रवादी… )

- Advertisement -

बदल्या करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये प्रविण मुंढे (परिमंडळ-४) यांची परिमंडळ-१ मध्ये, मोहित कुमार गर्ग (गुन्हे शाखा, प्रतिबंधक) यांची परिमंडळ-२ मध्ये, प्रशांत कदम (गुन्हे शाखा, प्रकटीकरण) यांची परिमंडळ-४ मध्ये, कृष्णकांत उपाध्याय (गुन्हे शाखा, प्रकटीकरण – १) यांची परिमंडळ९ मध्ये, दत्ता नलावडे यांची परिमंडळ-१० मध्ये, महेश रेड्डी (परिमंडळ-१०) यांची मुख्यालय १ मध्ये, अमोघ गावकर यांची गुन्हे शाखा (प्रतिबंधक) खात्यामध्ये, हरी बालाजी (परिमंडळ-१) यांची विशेष शाखा -१ या खात्यामध्ये आणि बालसिंग रजपुत यांची गुन्हे शाखा (प्रकटीकरण) या खात्यामध्ये बदली करण्यात आलेली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे यातील काही अधिकाऱ्यांच्या वर्षभरापूर्वी बदल्या करण्यात आलेल्या होत्या. पण आता पुन्हा एकदा त्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -